Huma Qureshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Huma Qureshi : साधी साडी, हातात बांगड्या अन् भांगेत कुंकू; असा आहे हुमा कुरेशीची 'महाराणी' मधला सामान्य लूक

हुमा कुरेशीने या वेबसीरिजमध्ये 'राणी भारती'हे पात्र साकारले आहे. जी एका गावातील सर्व साधारण महिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेली आणि प्रेक्षकांपासून ते समिक्षकांपर्यत सर्वांच्याच पसंतीस आलेली अभिनेत्री हुमा कुरेशीची(Huma Qureshi) 'महाराणी २' या वेबसीरीजची बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा रंगवली आहे. 'महाराणी'(Maharani) वेबसीरिजचा पहिला भाग आणि दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन 'सोनी लिव्ह' अॅपवर पाहता येतील. हुमा कुरेशीने या वेबसीरिजमध्ये 'राणी भारती'हे पात्र साकारले आहे. जी एका गावातील सर्व साधारण महिला आहे. जिने बदलत्या परिस्थितीमुळे राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.

हुमाच्या 'महाराणी २'मधील दमदार अभिनयामुळे तिची प्रशंसा केली जात आहे. हुमा आपल्या दमदार अभिनयामुळे मनोरंजन विश्वात अधिराज्य गाजवत आहे. महाराणी या वेबसीरिजचे निर्माते सुभाष कपूर असून या वेबसीरिजची स्क्रिप्ट सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया कशी होती हे हुमाने सांगितले आहे. ' मला ऑनलाईन वेबसीरिजची सर्व स्क्रिप्ट ऐकवली होती. वेबसीरिज करताना मनात खूप भिती होती. मला जेव्हा कळले की, माझ्या पात्रासाठी मला मेकअप करायचा नाही. हे ऐकल्यावर माझी अजून भिती वाढली. परंतू हा माझा लूक प्रेक्षकांना आवडेल का? याच भिती जास्त होते. पण प्रेक्षकांनी माझ्या पात्राला खूप चांगला प्रतिसाद दिला याचा मला आनंद आहे.'

पात्राबद्दल सांगताना पुढे हुमा म्हणाली, 'राणीचे वय २७ असते. तिने १२ वर्ष काम करत घरातला संसार पाहिला. तिचे लग्न लहान वयात झालेले असते. तिला लहान वयात ३ मुलांचे संगोपन करायचे होते. पात्रासोबतच शारिरीक बदलही करावा लागला होता. 'महाराणी २' मध्ये मी खूप कमी वेळेसाठी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे माझे कपडे चांगले आहेत. अन्यथा, पहिल्या भागामध्ये खरोखर रबरी चप्पल, विचित्र साडी घातलेली. कारण, शेण उचलणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या महिलांसारख्या देहबोलीची गरज होती. माझ्या मते प्रेक्षक वेबसीरिजशी जोडले जाण्यामागे राणीचा साधेपणा हे देखील एक कारण आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT