Hrithik Roshan-Saba Azad photos Instagram @hrithikroshan
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Dad To Be: हृतिक रोशन होणार बाबा? सबा अझादच्या पोस्टने नेटकरी चकित

saba Azad Pregnant:

Pooja Dange

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमीच चर्चेत असतात. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. हृतिक आणि सबा एकमेकांना रोमॅंटिक पोस्टमध्ये टॅग करत असतात. दोघेही नेटकऱ्यांसाठी कपल गोल्स सेट करत आहेत.

दरम्यान सबा आझादची एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवरून सबा आझाद गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सबा आझादने तिच्या इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर तिने तुमचा गायनॅक (स्त्रीरोग तज्ञ) कोण आहे?, असे विचारले आहे. सबाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हा एकच प्रश्न माझ्या डोक्यात फिरत आहे.'

सबा आझादच्या या पोस्टवर नेटकरी अनेक प्रश्न विचारत आहेत. 'हृतिक रोशन, ज्युनिअर रोशन येतोय का?, आधी लग्न करा, खरंच! सबा तू आई बनणार आहेस?' अशा अनेक कमेंट नेटकरी सबाच्या पोस्टवर करत आहेत. तसेच हृतिक रोशन आणि सुजेन खानला नेटकरी या पोस्टमध्ये टॅग करत आहेत. हृतिक रोशन सबा आझाद आणि त्याच्या मुलांसह परदेशात गेले होते. यावेळी दोघेही ट्रोल झाले होते.

सबा आझादचा जन्म १ नोव्हेंबर १९९० साली दिल्ली येथे झाला आहे. दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सबाने थिएटर जॉईन केले. २००८ साली 'दिल कबड्डी' या चित्रपटातून सबाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सबा चित्रपटांसह लघुपटांमध्ये देखील काम करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT