Hrithik Roshan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Net Worth: सलमान, रणवीरपेक्षाही श्रींमत आहे हृतिक रोशन,संपत्तीचा आकडा पाहून डोळे चक्रावतील

Hrithik Roshan Birthday: हृतिक ने 2000 मध्ये कहो ना प्यार है या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली. धूम 2, वॉर आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील अॅक्टिंगस्टाईलने ऋतिकने मोठी फॅनफॉलोविंग केली आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडमध्ये आपल्या अॅक्शन सीने लाखो चाहत्यांच्या मनावर राज करणारा अभिनेता म्हणून हृतिक रोशनकडे पाहिले जाते. हृतिक ने त्यांच्या फिल्मी कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हृतिक ने 2000 मध्ये कहो ना प्यार है या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली. धूम 2, वॉर आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील अॅक्टिंगस्टाईलने ऋतिकने मोठी फॅनफॉलोविंग केली आहे. हृतिकच्या अॅक्शनसीनचे चाहते आहेत.

हृतिक रोशनने 2013 साली स्वत:चा फिटनेस ब्रँड लॉन्च केला. या ब्रँडिंग कंपनीची एकूण संपत्ती 200 कोटी रूपये इतकी आहे. ज्यामधून हृतिक रोशन लाखोंची कमाई करतो.ब्रँड एंडोर्समेंट्समधून दरवर्षी भरपूर कमाई करतो. एका ब्रँडिंगसाठी हृतिक रोशन सुमारे 3 ते 5 कोटी रूपये घेतो. सोशल मीडियावर हृतिक रोशन हा सक्रिय असतो. इन्स्टाग्राम पोस्टसाठी हृतिक रोशन 4 ते 5 कोटी रूपये घेतो.

हृतिक रोशनची एकूण संपत्ती 3100 कोटी रूपये इतकी आहे. माहितीनुसार, एका चित्रपटासाठी हृतिक रोशन 65 ते 75 मानधन घेतो. फायटर या चित्रपटासाठी हृतिकने 50 कोटी रूपये फि घेतली होती.

हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या हृतिक त्याच्या 'वार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यात ज्युनियर एनटीआरही दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक आणि ज्युनियर एनटीआर आमनेसामने दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT