Saba Azad And Hrithik Roshan Breakup Rumourous Instagram @hrithikroshan
मनोरंजन बातम्या

Saba Azad And Hrithik Roshan : अभिनेत्याचा १४ वर्षांचा संसार मोडला, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला केलं डेट; ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान गर्लफ्रेंडसोबत मूव्ही डेट

Saba Azad And Hrithik Roshan Breakup Rumourous : हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअपच्या अफवांवर पूर्णविराम लागल्याचं दिसून येत आहे.

Jyoti Shinde

सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटीज मध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चनच्या 'ग्रे शेड' घटस्फोटाची चर्चा ताजी असतांनाच, इथे मात्र अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअपच्या अफवांवर पूर्णविराम लागल्याचं दिसून येत आहे. अभिनेता हृतिक आणि सबा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे, 2022 ला त्यांनी त्यांच्या रिलेशनशिप ची अधिकृत माहिती जाहीर केली होती. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांविषयी भावना व्यक्त करतांना दिसलेत.

मात्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळात हृतिक रोशनने सोलो हजेरी लावल्याने सगळ्यांचेच भुवया उंचावल्या गेल्या. गेले अनेक फंक्शन मध्येही हृतिक रोशन एकटाच दिसला होता त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिप बद्दलची कुजबुज सगळीकडे होऊ लागली होती. यांच्यात काही बिनसलं तर नाही ना ? असे अनेक प्रश्न नेटकरांच्या मनात उपस्थित झाल्याचे दिसून येत होतं. असं असतांना मात्र सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझादचा सोबतीचा व्हिडिओ वायरल होतांना दिसत आहे.

ह्या व्हिडिओ मध्ये हृतिक रोशन आणि सबा एका मल्टिफ्लेक्समधून बाहेर पडतांना दिसत आहे. सबाने स्वतःचा मोबाइल हृतिकच्या हातात दिला आणि सबा अभिनेता हृतिक रोशनचा हात पकडून चालू लागली. त्याचबरोबर ह्या व्हिडिओ मध्ये दोघांनी ही स्वतःच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत आहे.

मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच,या दोघांमध्ये तर सगळं काही अलबेल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच हृतिक रोशन आणि सबाच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागलं आहे. अभिनेता हृतिक रोशनने 2000 मध्ये सुझान सोबत लग्न केलं होतं, तब्बल 14 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांना डेट करू लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT