Housefull 5 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' लवकरच गाठणार १५० कोटींचा टप्पा, ८व्या दिवशी कलेक्शनचा आकडा किती?

Housefull 5 Box Office Collection Day 8: अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' (Housefull 5) चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या चित्रपटाने एक आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'हाऊसफुल 5'ने धमाकेदार ओपनिंग केली आहे. मात्र दिवसेंदिवस 'हाऊसफुल 5'च्या कलेक्शनमध्ये घसरण होताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 5'मध्ये रितेश आणि अभिषेकसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट आता लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाने आठ दिवसांत 133.25 कोटी रुपये कमावले आहेत.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 8

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 7 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6 कोटी रुपये

  • एकूण - 133.25 कोटी रुपये

'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'चा बजेट तबल 225 कोटी रुपये आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT