Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : 'हाऊसफुल 5'ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ, पार केला १५० कोटींचा टप्पा

Housefull 5 Box Office Collection Day 10: कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5'सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'हाऊसफुल 5' (Housefull 5) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. आता चित्रपटाने रिलीजच्या 10 दिवसांत 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 'हाऊसफुल 5'ने प्रेक्षकांवर जादू केली आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने दहा दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 10

  • 'हाऊसफुल 5' दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 7 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6 कोटी रुपये

  • नववा दिवस - 9.5 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 11 कोटी रुपये

  • एकूण - 153.75 कोटी रुपये

'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. या चित्रपटात फुल कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे.'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'चा बजेट तबल 225 कोटी रुपये आहे.

'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 5'मध्ये रितेश, अभिषेक, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT