Hou De Dhingana 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hou De Dhingana 2: रौद्ररसात अरुंधतीने गायलेलं गाणं एकदा ऐकाच, 'होऊ दे धिंगाणा २' चा प्रोमो व्हायरल

Hou De Dhingana 2 : 'होऊ दे धिंगाणा 2' मालिकेची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hou De Dhingana 2 Latest Promo:

स्टार प्रवाहवरील 'होऊ दे धिंगाणा 2' हा कार्यक्रम खूप जास्त लोकप्रिय आहे. टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम नेहमी पहिल्या स्थानावर असतो. सिद्धार्थ जाधवचं सुत्रसंचालन या कार्यक्रमाला अधिकच रंजक बनवतो. कार्यक्रमात प्रत्येक भागात वेगवेगळ्या मालिकेतील कलाकार हजेरी लावतात आणि धिंगाणा घालतात.

'होऊ दे धिंगाणा 2' मालिकेची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता 'होऊ दे धिंगाणा 2' कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

येत्या शनिवारी 'होऊ दे धिंगाणा २' च्या मंचावर 'आई कुठे काय करते' आणि 'अबोली' या मालिकेची टीम हजेरी लावणार आहे. तसेच कार्यक्रमात 'झिम्मा २' ची टीमदेखील हजेरी लावणार आहे. कार्यक्रमाचा नवीन प्रोमो खूप जास्त मजेशीर आहे. प्रोमोत अरुंधती गाणं गाताना दिसत आहे.

प्रोमोच्या सुरुवातील मंचावर सिद्धार्थ जाधव, मधुराणी प्रभुलकर, हेमंत ढोमे आणि सचित पाटील दिसत आहे. यात सिद्धार्थ जाधव अरुंधतीला म्हणतो की, 'आपल्याकडे नऊ रस आहेत. जो रस मी म्हणेन त्या रसात तू गाणं म्हणायचं. त्यानंतर सिद्धार्थ म्हणतो की, रौद्ररस... यावर अरुंधती मोठ्या आवाजात राग दाखवत कसं काय पाटील बर हाय का.. हे गाणं गाते. त्यानंतर सिद्धार्थ म्हणतो, शृगांर रस. त्यानंतर अरुंधती जरा हलक्या आवाजात गाणं गाते. यावेळी सर्वजण तिची मज्जा घेताना दिसत आहे. त्यानंतर तिला हास्य रसात गाणं म्हणायला सांगतात. त्यावर ती मोठमोठ्याने हसते. या प्रोमोत सर्व कलाकार खूप जास्त मज्जा करताना दिसत आहे.

'होऊ दे धिंगाणा २' या कार्यक्रमाच्या येत्या भागात 'झिम्मा २' चे कलाकार दिसणार आहेत. प्रमोशनसाठी हे कलाकार उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाच्या येत्या भागात खूप जास्त मज्जा केल्याचे दिसत आहे. येत्या भागात सिद्धार्थ चांदेकर कलाकारांकडून कोणते नवे खेळ खेळून घेणार? हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

SCROLL FOR NEXT