Honey Singh New Album
Honey Singh New Album Saam TV
मनोरंजन बातम्या

Honey Singh New Album: ९ वर्षांनी हनी सिंगचे पुनरागमन; नवीन अल्बमच्या माध्यमातून व्यक्त केले प्रेमभंगाचे दुःख

Pooja Dange

Honey Singh Spoke About His Break Up: रॅपर हनी सिंगची खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. हनी सिंगने अनेक रॅप साँग त्याच्या करियरमध्ये गायली आहेत. जी आजही लोकांच्या तोंडावर आहेत. आता 9 वर्षांनंतर हनी सिंग त्याच्या नैराश्याशी लढा देऊन परतला आहे. आता त्याचा नवीन अल्बम हनी 3.0 प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचे पहिले गाणे 1 एप्रिल रोजी लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.

हनी सिंग खूप मोठ्या ब्रेकनंतर आपल्या कामावर परतला होता, मात्र ब्रेकअपमुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला होता. त्याच्या ब्रेकअपमुळे अल्बम रिलीजवर का परिणाम झाला, हे हनी सिंगने सांगितले आहे.

हनी सिंगने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आता जेव्हा मी नवीन सुरुवात केली, तेव्हाही मी प्रेमात पडलो होतो आणि त्यावेळी मी संपूर्ण अल्बम बनवला होता. जो रोमँटिक होते, परंतु दुर्दैवाने, हे नाते टिकले नाही, म्हणून मला अल्बम बदलावा लागला. अल्बमला उशीर झाला. अल्बमला 3 महिन्यांचा उशीर झाला.

जानेवारीत येणार अल्बमआता एप्रिलमध्ये आला आहे. मी अल्बम पूर्णपणे फ्लिप केला. सुरुवातीला अल्बममध्ये दिग्दर्शन प्रेम, नृत्य आणि रोमान्सचे होते, परंतु जेव्हा नाते तुटले तेव्हा मी अल्बम बदलून टाकला.

या अल्बमविषयी माहिती देताना हनी सिंग म्हणाला की, 'आता अल्बम मसालेदार, व्यावसायिक आणि जुनी पद्धतीचा आहे. यात 9 गाणी होती आणि 9 गाणी प्रेम, नृत्य आणि रोमान्सवर होती आणि 1 गाणे 'नागन' होते जे जुन्या प्रेक्षकांसाठी होते ज्यांना दमदार पंजाबी व्हाइब्स हवा होता. अल्बममधील 'तुझ पे प्यार' हे गाणे प्रदर्शित होणार आहे. मी अल्बम मधील इतर सर्व गाणी काढून टाकली आहेत.

हनी सिंग म्हणाला की तो जे पाहतो त्यावर गाणी लिहितो. तो म्हणाला, "जे काही आयुष्य जगलो, ते मी लिहिले. मी जे पाहिले ते लिहिले. मी पार्टी करायचो. जेव्हा एकाद्या मुलगी पेअर बनवायची आणि ते पाहिल्यावर मी लिहिले, 'एन्ना वी ना डोप शोप मारेया करो, सानू एह वे कह नक चढ़ेया करो'.

मी जे काही जगलो, ते लिहिलं. मी प्रेमात पडलो, मी माझे हृदय तोडले, मी गाणे लिहिली. मी पार्टी केली, मी गाणी लिहिली, मी प्यालो, मी गाणे लिहिले. मी खूप प्यायल्यावर लिहिले, 'चार बाटल्या वोडका'."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या आंबलीतून 55 जणांना झाली विषबाधा

Jharkhand News : ईडीची मोठी कारवाई, झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांना अटक

Unemployment Rate : भारतात बेरोजगारी घटली, रोजगारात मोठी वाढ; सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

Panchganga River: पंचगंगेच्या प्रदूषणावरुन नागरिकांत संताप, महामंडळाचे दुर्लक्ष हजारो मासे मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT