Avatar: The Way of Water Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avatar The Way Of Water: 'अवतार २' थिएटरमध्ये बघताना चाहता कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गेले अनेक वर्ष प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. त्यामूळे प्रेक्षक या चित्रपटाला पाहण्यासाठी फारच आतुर होते. पण चित्रपटासंबधित एक वाईट बातमी समोर आली आहे.

Chetan Bodke

Avatar The Way Of Water: नुकताच जॅम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार द वे ऑफ वॉटर' अर्थात अवतार २ नुकताच प्रदर्शित झाला आहे. तब्बल १३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करुन चाहत्यांना दिलासा दिला आहे. गेले अनेक वर्ष प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. त्यामूळे प्रेक्षक या चित्रपटाला पाहण्यासाठी आतुर होते. पण चित्रपटासंबधित एक वाईट बातमी समोर आली आहे.

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात नुकताच प्रदर्शित झालेला 'अवतार 2' चित्रपट पाहताना एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना पेद्दापुरम शहरातील असल्याचे कळत आहे. मृत वक्तीचे नाव लक्ष्मीरेड्डी श्रीनू असे आहे. चित्रपट पाहण्यासाठी श्रीनू त्याचा भाऊ राजू पेद्दापुरमला एकत्र गेला होता.

यावेळी त्याच्या भावाने सांगितले की, चित्रपट पाहतान श्रीनू अचानक खाली कोसळला. त्याला लगेचच पेद्दामपुरम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे डॉक्टरांनी श्रीनूला मृत घोषित केले. लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

नेहमी श्रीनूला तपासणाऱ्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला उच्च रक्तदाबाचा आजार होता. अतिउत्साहीपणामुळे चित्रपट पाहताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवतारचा पहिला भाग पाहताना २०१०मध्ये तैवानमधील ४२ वर्षीय व्यक्तीचा ही हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT