Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Famous Actor Passes Away : प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट डुवैल यांचे निधन झाले आहे. मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते यांचे निधन झाले आहे.

ऑस्कर विजेता अभिनेत्याने वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुवैल (Robert Duvall) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी लुसियाना (Luciana Pedraza) यांनी ही माहिती दिली आहे. अभिनेत्याचे निधन राहत्या घरी व्हर्जिनिया येथे झाले. रॉबर्ट डुवैल हे 'द गॉडफादर' आणि 'अपोकॅलिप्स नाऊ' सारख्या प्रतिष्ठित चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जात होते.

अभिनेते रॉबर्ट डुवैल यांचे रविवारी व्हर्जिनियातील मिडलबर्ग येथील त्यांच्या घरी निधन झाले. ऑस्कर विजेता अभिनेता रॉबर्ट डुवैल हे सहा दशकांच्या त्यांच्या शानदार चित्रपटांतील कारकि‍र्दीसाठी ओळखले जातात. त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता रॉबर्ट डुवैल हे ऑस्कर पुरस्कार विजेते आणि सहा वेळा नामांकित होते.

फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या 'द गॉडफादर' मध्ये डुव्हलने कॉर्लिओन कुटुंबाच्या सल्लागाराची भूमिका त्यांनी साकारली, ज्यामुळे 1972 च्या या चित्रपटासाठी त्यांना सात अकादमी पुरस्कार नामांकनांपैकी पहिले नामांकन मिळाले. रॉबर्ट डुवैल यांची पत्नी लुसियाना यांनी निधनाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "रविवारी, मी माझा प्रिय पती, मित्र आणि आमच्या काळातील एक महान अभिनेते रॉबर्ट डुवैल यांना गमावले..."

जन्म कुठे झाला?

प्रसिद्ध चित्रपट निर्माते रॉबर्ट डुवैल यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथे झाला. रॉबर्ट डुवैल यांचा जन्म 5 जानेवारी 1931 रोजी झाला. त्यांचे बालपण बहुतेक काळ मेरीलँडमधील अ‍ॅनापोलिस येथे घालवले. डुवैल यांचे वडील एक व्यावसायिक नौदल अधिकारी होते. रॉबर्ट डुवैल हे हॉलिवूडमधील सर्वात आदरणीय अभिनेत्यांपैकी एक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT