Priyanka Chopra and daughter Malti Marie Jonas Instagram @maltimarie.choprajonas
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Daughter: मालतीला बिर्याणी आवडते कारण.. लेकीचं कौतुक करताना प्रियंकाने केला मोठा खुलासा

Malti Marie Jonas: मालती जोनाससारखी दिसत असली तरी ती पक्की चोप्रा आहे.

Pooja Dange

Priyanka Shares Malti's Habits: हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या बॉलिवूडवरील वक्तव्यांमुळे चर्चेत होती. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सोहळ्याला आणि तिच्या आगामी वेब सीरिज 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी भारतात आली होती. दरम्यान, तिच्या मुलीने साऱ्यांचे लक्ष वेधले. अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की आमची मुलगी जोनाससारखी दिसत असली तरी ती पक्की चोप्रा आहे.

मीडियाशी बोलताना प्रियंकाने सांगितले केले की तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास ही पक्की चोप्रा आहे. तिच्या मुलीला भारतीय जेवण खूप आवडते. मालतीला पनीर मटर आणि बिर्याणी हे पदार्थ आवडतात. देसी गर्लची मुलगी दिसायला विदेशी असली तरी ती पूर्णपणे देसी आहे. मालतीला मसालेदार पदार्थ आवडतात, असे प्रियंकाने सांगितले आहे.

प्रियांका तिचा पती निक आणि मुलगी मालतीसोबत तिच्या हॉलिवूड वेब सीरिज 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी भारतात आली होती. यादरम्यान, अभिनेत्रीने मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिच्या दमदार कामगिरीचे खूप कौतुक झाले.

'सिटाडेल' व्यतिरिक्त, ती बॉलिवूड चित्रपट निर्माता फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' चित्रपटाचा देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

प्रियांकाने एनएमएसीसी दरम्यान केलेले लूक देखील चर्चेत होते. दरम्यामपार्टीच्या वेळी प्रियंका आणि निकने रिक्षाचा वापर केउन फोटोशूट देखील केले. यावेळी घातलेल्या प्रियांकाच्या कपड्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

प्रियंकाने मल्टीकलरचा ड्रेस घातला होता. प्रियांकाचा हा ड्रेस ६५ वर्षपूर्वीच्या बनारसी पटोला साडीपासून बनविण्यात आला होता. या साडीवर चंदेरी आणि सोनेरी जर होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT