Actor Death Saam TV
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; राहत्या घरी आढळला मृतावस्थेत, मनोरंजन विश्वात हळहळ

Actor Death:'द सोप्रानोस'मधील गँगस्टरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले हॉलिवूड अभिनेता व्हिन्सेंट पास्टोर यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. सहकलाकार मायकल इम्पेरिओली यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Actor Death: हॉलिवूडमधील लोकप्रिय मालिका द सोप्रानोस (The Sopranos) मधील गँगस्टरच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते आणि सह-कलाकार मायकल इम्पेरिओली यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मायकल इम्पेरिओली यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले की, "माझा प्रिय मित्र आणि सहकारी व्हिन्सेंट पास्टोर आता आपल्यात राहिले नाहीत. हा आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी क्षण आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले, अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास केला. त्याच्यासोबत घालवलेले क्षण कायम स्मरणात राहतील. विनी माझ्यासाठी भावासारखा होता. तो अत्यंत दयाळू आणि आपल्या कुटुंबावर, मित्रांवर मनापासून प्रेम करणारा उत्तम व्यक्ती होता. त्यांची उणीव कायम जाणवत राहील."

व्हिन्सेंट पास्टोर यांच्या निधनाबाबत त्यांचे मॅनेजर बॉब मॅकगोवन यांनी द असोसिएटेड प्रेसला माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार,काही दिवसांपासून पास्टोर कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यानंतर न्यूयॉर्कमधील सिटी आयलंड येथील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

व्हिन्सेंट पास्टोर यांनी १९८० च्या दशकापासून अभिनय क्षेत्रात कारकीर्द सुरू केली होती. १९९० च्या दशकात त्यांनी हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, द सोप्रानोस या गाजलेल्या मालिकेतील साकारलेली गँगस्टरची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय भूमिका ठरली. या मालिकेत त्यांनी सुरुवातीला एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती, तर पुढे त्याच पात्राने एफबीआयचा खबरी बनत कथेला वेगळे वळण दिले होते. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठी दाद मिळाली.

अभिनेता होण्यापूर्वी व्हिन्सेंट पास्टोर यांनी अमेरिकन नौदलात सेवा बजावली होती. व्हिएतनाम युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पेस युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण करून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्या निधनाने हॉलिवूडने एक अनुभवी आणि दमदार अभिनेता गमावला आहे.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT