Manny Coto Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manny Coto Death: एमी पुरस्कार विजेते मॅनी कोटोचे गंभीर आजाराने निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manny Coto Dies: हॉलिवूड अभिनेते मॅनी कॉटो यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं आहे.

Chetan Bodke

Manny Coto Passes Away: हॉलिवूडमधून दु:खद बातमी येत आहे. हॉलिवूड अभिनेते मॅनी कॉटो यांचं निधन झालं आहे. यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मॅनी कॉटो गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगासोबत झुंज देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मॅनीने रविवारी त्याच्या पासाडेना मधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक या आजारासंबंधित त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

अभिनेत्याला '24' या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटकाचा एमी पुरस्कार मॅनी कोटो यांनी जिंकला होता. मॅनी कोटो यांनी फॉक्सचे AI नाटक NeXT याची सह-निर्मिती केली. याशिवाय डेक्सटर, स्टार ट्रेक: एंटरप्राइज, अमेरिकन हॉरर स्टोरी आणि इतर अनेक सिरीजचे ते निर्माते होते. निर्मात्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

निर्मात्यांच्या निधनाची बातमी कुटुंबातील एका महत्वाच्या व्यक्तीने दिली आहे. निर्माते गेल्या १३ महिन्यापासून आजाराविरोधात लढत होते. त्यांची अखेर ही झुंज अपयशी ठरली. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याचे कुटूंब सोबत होते.

मॅनी कॉटोने टेलिव्हिजन मालिका 'ओडिसी 5' तसेच फॉक्स मालिका 'नेक्स्ट' ची निर्मिती केली आहे. निर्मात्याने 'डेक्स्टर'च्या शेवटच्या तीन सीझन आणि 'स्टार ट्रेक: एंटरप्राइज'च्या शेवटच्या दोन सीझनमध्येही अभिनय देखील केला आहे. मुख्य बाब म्हणजे, कोटो यांनी १९९२च्या 'डॉ.' या सिरीजचे सह-लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. (Hollywood)

कोटोच्या सुरुवातीच्या मालिका आणि चित्रपटांमध्ये ख्रिस्तोफर मॅकडोनाल्ड स्टारर हॉरर थ्रिलर 'प्लेरूम'चा समावेश आहे. याशिवाय डॉल्फ लुंडग्रेन स्टारर पॉलिटिकल थ्रिलर 'कव्हर-अप', फॅमिली साय-फाय फिल्म 'स्टार किड' आणि डिस्ने चॅनल फिल्म 'झेनॉन: द जेकिल' अशा सिनेमांचा समावेश आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT