Johnny Depp-Amber Heard Saam Tv
मनोरंजन बातम्या

Johnny Depp-Amber Heard: अँबर हर्डकडून मिळालेले पैसे जॉनी डेप करणार दान, जिंकला होता मानहानीचा खटला

अँबर हर्डकडून मिळालेले पैसे जॉनी डेप करणार दान, जिंकला होता मानहानीचा खटला

Satish Kengar

Johnny Depp-Amber Heard: 'पायरेट्स ऑफ कॅरिबियन' फेम हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आहे त्याची विभक्त पत्नी अँबर हर्ड.

मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनीला अँबरकडून मिळालेले पैसे तो दान करणार आहे. एक मिलियन डॉलर्स म्हणजेच ८ कोटींहून अधिक रुपये चॅरिटीसाठी देणार आहेत, ज्यामुळे मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी मदत होईल.

'सीएनएन'ने मंगळवारी एका स्त्रोताच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, जॉनी डेपने अँबरकडून मिळालेले सेटलमेंटचे पैसे दान करण्यासाठी मेक-ए-फिल्म फाऊंडेशन, द पेंटेड टर्टल, रेड फेदर, मार्लन ब्रँडोची टेटियारोआ सोसायटी चॅरिटी आणि अॅमेझोनिया फंड या पाच धर्मादाय संस्थांची निवड केली आहे. सूत्रानुसार, अभिनेत्याने पाच धर्मादाय संस्थांपैकी प्रत्येकाला 200,000 डॉलर्स देणगी देण्याची योजना आखली आहे.

2015 मध्ये केलं लग्न आणि एका वर्षानंतर घटस्फोट

जॉनी आणि अँबरने अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१५ मध्ये त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी कोणताही गाजावाजा न करता गुपचूप लग्न केलं होतं. अँबरने २३ मे २०१६ रोजी जॉनीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिने सांगितले होते की, जॉनीने तीच शारीरिक शोषण केलं आणि अनेकदा त्याने तिला मारहाण ही केली.  (Entertainment News)

जॉनीने जिंकला होता मानहानीचा खटला

जॉनीने मार्च २०१९ मध्ये अँबर विरुद्ध ५० मिलियन डॉट्सचा मानहानीचा खटला वॉशिंग्टन पोस्टच्या ऑप-एडमध्ये दाखल केला होता. ज्यामध्ये अँबरने आपण घरगुती हिंसाचाराची बळी असल्याचं लिहिलं होतं. (Latest Marathi News)

लेखात जॉनीच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर याला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर दोघांमध्ये मोठी कायदेशीर लढाई झाली आणि शेवटी जॉनीने खटला जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT