KK Goswami's Son Accident In Mumbai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navdeep Car Accident: केके गोस्वामीच्या कुटुंबाला मोठा धक्का.. २१ वर्षीय मुलगा कार चालवताना गाडीने पेट घेतला आणि...

Chetan Bodke

KK Goswami's Son Accident In Mumbai: हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या कॉमेडीमुळे सर्वत्र प्रचलित असलेला केके गोस्वामी नुकताच एका मोठ्या घटनेतून थोडक्यात बचावला आहे. काल रात्री त्याच्या मुलाच्या कारला मुंबईतील रस्त्यावर अपघात झाला आहे. २१ वर्षीय नवदीपचा कार चालवताना अपघात झाला. ही घटना मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या एसव्ही रोडवर घडली. केके गोस्वामी यांचा मुलगा कारने आपल्या घरातून फिल्मिस्तान स्टुडिओजवळ कॉलेजकडे जात होता. या घटनेमुळे गोस्वामी यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.(Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवदीप कार चालवत असताना अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. केके गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला. तसेच या घटनेत त्याला कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या मुंबई पोलिस आणि अग्निशमन दल नवदीपच्या कारला कशी आग लागली, याचा शोध घेत आहे. (Marathi TV Serial)

केके गोस्वामीबद्दल बोलायचे तर त्याचे खरे नाव कृष्णकांत गोस्वामी आहे. त्याने आतापर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती आणि भोजपूरी सह इत्यादी भाषांमध्ये काम केले आहे. ‘शक्तिमान’, ‘गूटर गू’, ‘ज्युनियर जी’, ‘भाभी जी घर पर हैं’, ‘शका लका बूम बूम’, ‘सीआयडी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ सोबत इतर शोच्या माध्यमातून त्याला सर्वाधिक ओळख मिळाली.(Entertainment News)

केके गोस्वामी हे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असून अभिनेता होण्यापूर्वी तो गावात स्टुडिओ चालवायचा. ‘मुर्ती लहान पण किर्ती महान’ या उक्ती प्रमाणे त्याने फार संघर्ष केला. (Bollywood News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT