Govinda told that why he is not getting films Instagram @govinda_herono1
मनोरंजन बातम्या

Govinda Rejected Bollywood Movie: 'म्हणून मी स्वतःच्याच कानशीलात लगावल्या...' चित्रपटामध्ये काम न मिळण्यामागचं गोविंदाने सांगितलं कारण

Govinda Upcoming Movie: गोविंदाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटापासून दूर असल्याचे कारण सांगितले आहे.

Pooja Dange

Govinda Slapped Himself:

अभिनेता गोविंदा ९०च्या दशकातील सुपरहिरो आहे. त्याने एकावेळी ७० चित्रपट साइन केले होते. चित्रपटांमध्ये पदार्पण केल्यानंतर गोविंदाने ३-४ वर्षात ४० चित्रपट केले होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून गोविंदा चित्रपटामध्ये दिसलेला नाही. त्यामुळे गोविंदाचे फॅन्स त्याला चित्रपटात कधी दिसणार असे वारंवार विचारत आहेत.

गोविंदाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटापासून दूर असल्याचे कारण सांगितले आहे. तसेच गेल्या वर्षी १०० कोटींचे चित्रपट नाकारले असल्याचे म्हटले आहे.

गोविंदाने संपूर्ण कुटुंबासमवेत गणेश चतुर्थी साजरी केली. दरम्यान त्याने मीडियाशी संवाद देखील साधला. तेव्हा गोविंदाने चित्रपटात का काम करत नाही याविषयी सांगितले.

मीडियाशी संवाद साधताना गोविंदाने सांगितले की, 'मी सहज कोणतेही काम स्वीकारत नाही. पण ज्या लोकांना असं वाटत की मला काम मिळत नाही, त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्यावर बाप्पाची कृपा आहे. मी गेल्या वर्षी १०० करोड रूपयांचे प्रोजेक्ट सोडून दिले आहेत.

गोविंदाने त्यानंतर गंमतीने म्हटलं की 'मी आरशासमोर उभं राहून स्वत: च्या कानशीलात मारल्या. कारण मी कोणतेच प्रोजेक्ट साईन करत नव्हतो. ते लोक मला खुप पैसे देत होते. पण मला असाच कोणताही थुकरट रोल करायचा नव्हता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT