Hemant Dhome Share Post For Kshiti Jog  Instagram @hemantdhome21
मनोरंजन बातम्या

Hemant Dhome Share Post : जगातला तुझा सगळ्यात मोठा चाहता… हेमंत ढोमने भरभरून केलं पत्नीचं कौतुक

Hemant Dhome - Kshiti Jog : हेमंत ढोमेने पत्नी क्षितीचे खूप कौतुक केले आहे.

Pooja Dange

Hemant Dhome After Watching Rocky Aur Rani Ki Prem Kahani :

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशी हेमंत ढोमेची ओळख आहे. हेमंतने चित्रपटामध्ये अभिनेता म्ह्णून काम केलं आहे. त्याचबरोबर लेखन, दिग्दर्शन देखील केलं आहे. हेमंत जसा हरहुन्नरी आहे, तशीच त्याची पत्नी क्षिती हाडाची कलावंत आहे.

क्षिती जोगने अनेक नाटक, मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. मराठीसह क्षिती हिंदीसृष्टीत देखील सक्रिय आहे. हेमंत ढोमेने पत्नी क्षितीचे खूप कौतुक केले आहे. हेमंत क्षितीच्या इतक्या प्रेमात का आहे ? चला जाणून घेऊया.

हेमंत ढोमे क्षिती कौतुकात काय लिहिले ?

हेमंत ढोमने क्षितीसाठी लिहिले आहे की, 'पाटलीणबाई, आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ॲाफिसमधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लूक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं, बघता बघता सिनेमाचं शूट झालं…

हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शोला तुझ्यासोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शोनंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!

आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला… तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय… सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवल्या… त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं…

हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय… इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल!

क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण #rockyaurranikipremkahani या चित्रपटाबद्दल Thank you! आपणंच हे सारं केलंय, हे सगळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता… हेमंत. खूप खूप मोठी हो, love you!'

क्षिती जोग करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी ओर रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा भाग आहे. काल म्हणजे २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटादरम्यानचा क्षितीचा प्रवास सांगणारी पोस्ट हेमंतने केली आहे. तसेच क्षिती कौतुक देखील केले आहे.

हेमंतने त्याच्या सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिले आहे. तसेच त्याने लवकरात लवकर चित्रपट बघ आणि आपल्या क्षितीच काम बघा, असे म्हटले आहे. हेमंतच्या या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT