Jhimma 2 1st Weekend Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 1st Weekend Collection: हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा २’चा पहिल्या विकेंडला थिएटरमध्ये जलवा, ३ दिवसांतच केली ५ कोटींपार कमाई

Chetan Bodke

Jhimma 2 1st Weekend Box Office Collection

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रत्येकालाच चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अखेर २४ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला पहिल्या विकेंडला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...

‘झिम्मा २’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाला दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने १.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी २.१५ कोटी तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाला २.५० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाने एकूण तीन दिवसातच ५.८० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा सध्याचा आलेख पाहता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘झिम्मा’चा पहिला भाग गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सुपरडुपरहिट चित्रपट ठरला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, सेलिब्रिटींकडूनही आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट गेल्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या तगड्या स्टारकास्टने मुख्य भूमिका साकारली आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Astrology: ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा बर्थडे कधी?

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT