Hemangi Kavi with Yuvraj Singh  Saam TV
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi Post: हेमांगी कवीच्या जाळ्यात अडकला युवराज सिंग; नवीन प्रोजेक्टच्या BTS फोटोंनी वेधलं लक्ष

Hemangi Kavi: हेमांगी कवीने युवराज सिंगसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Hemangi Kavi - Yuvraj Singh Project:

अभिनेत्री हेमांगी कवी अभिनयासह तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. तिचा पोस्ट या नेहमीच चर्चेत असतात. हेमांगी कधी सामाजिक भान आणणाऱ्या, कधी समाजाला भानावर आणणाऱ्या पोस्ट करते. कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे स्वप्न सांगते तर कधी अनुभवलेले सत्य.

अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये स्वप्नात घडावं असं काहीसं तिच्यावसबत घडलं आहे. ही पोस्ट तिच्या नव्या कामाबाबत आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

हेमांगी कवीने सुप्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोंमध्ये हेमांगी कवी कोळीण बनली आहे.

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये हेमांगीने लिहिले आहे की, 'किती देखणा आणि हसतमुख आहे हा माणूस!' या व्हिडीओच्या माध्यमातून हेमांगी कवीने युवराज सिंगचे कौतुक केले आहे.

हेमांगी कवी आणि युवराज सिंग यांनी बिस्लेरीचा आगामी जाहिरातीसाठी एकत्र काम केले आहे. हेमांगीने शेअर केलेले हे BTS फोटोपाहून जाहिरात खूप इंटरेस्टिंग असेल हे नक्की.

तिच्या या पोस्टवर अभिनेता समीर चौघुलेने कमेंट करत हेमांगीचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील हेमांगीच्या पोस्टवर 'वाह वाह' अशी कमेंट केली आहे.

हेमांगी कवी स्टार प्रवाहवरील मालिका 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत दिसली होती. सध्या तिचे जन्मवारी हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT