Hema Malini Birthday Party In Bollywood Celebrity Instagram
मनोरंजन बातम्या

Hema Malini Birthday Party: बर्थडे ‘ड्रीम गर्ल’चा जल्लोष बॉलिवूडचा, हेमा मालिनींच्या ७५ व्या वाढदिवसाला दिग्गजांची मांदियाळी...

Hema Malini Birthday News: बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी १६ ऑक्टोबरला ७५ वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.

Chetan Bodke

Hema Malini Birthday Party

बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी १६ ऑक्टोबरला ७५ वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी त्यांच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

ईशा देओलपासून सलमान खान, जया बच्चन, जॅकी श्रॉफपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर ‘ड्रीम गर्ल’च्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. खास बर्थडे पार्टीसाठी हेमा यांनी गुलाबी रंगाची शिमरी साडी, डायमंड नेकलेस, इयर रिंग्स, मॅचिंग बांगड्या असा त्यांचा संपूर्ण लूक होता. दरम्यान अभिनेत्रीच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे. हेमा यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हजेरीमध्ये वाढदिवसाचा केक कापला.

हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीतले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, माधुरी दीक्षित, सोबत पती श्रीराम नेणे, राणी मुखर्जी, रेखा, रवीना टंडन आणि विद्या बालन हे सेलिब्रिटी मंडळी पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाले. यावेळी सर्वच सेलिब्रिटींच्या लूकची तुफान चर्चा होत आहे.

पण जरीही असे असले तरी, या पार्टीमध्ये सनी देओल, बॉबी देओल उपस्थित नसल्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Gifts: वास्तुशास्त्रानुसार लग्नात वर-वधूंना चुकूनही या ४ भेटवस्तू देऊ नका, नात्यात पडू शकते फूट

Chanakya Niti: १०० वेळा विचार करा, ५ स्वभाच्या व्यक्तींसोबत मैत्री केल्याने पडाल खड्ड्यात? चाणक्यांनी सांगितले श्रीमंती आणि यशाचे गुपित

Raj-Uddhav Thackeray Alliance: सात नाहीतर ६ ठिकाणी बंधूंची युती, मुंबईसह 'या' महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार

Maharashtra Live News Update: जिथे गाड्या फोडल्या, तिथेच पोलिसांनी काढली मावस भावांची "वरात

Pista Benefits: रोज सकाळी ५ पिस्ता खल्ल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT