Aditi And Siddharth Romantic Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditi And Siddharth : लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत गेली फिरायला; रोमॅंटिक फोटो केले शेअर

Aditi And Siddharth Romantic Photo : आदिती आणि सिद्धार्थने मार्च महिन्यात गुपचूप साखरपुडा आटोपला. त्यानंतर सध्या हे कपल एकत्र टाईम स्पेंड करीत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपासून आदिती कधी आपल्या पर्सनल लाईफमुळे तर कधी आपल्या प्रोजेक्टमुळे चर्चेत राहत आहे. आदिती आणि सिद्धार्थने मार्च महिन्यात गुपचूप साखरपुडा आटोपला. त्यानंतर सध्या हे कपल एकत्र टाईम स्पेंड करीत आहे. दोघेही एकत्रित सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. नुकतेच आदितीने इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

आदिती आणि सिद्धार्थने गेल्या काही दिवसांपूर्वी तेलंगणाच्या ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा केला. त्यानंतर या कपलने एक फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आता चाहते सध्या त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. अशातच अभिनेत्रीने दोघांचेही काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. दोघेही सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे दोघेही नेमके कुठे फिरायला गेले आहेत, हे काही कळत नाही. पण सध्या आदिती आणि सिद्धार्थ निसर्गाच्या कुशीत सुट्टीचा आनंद घेत आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांनीही अगदी सिंपल अंदाज केलेला दिसत आहे. सध्या दोघांच्याही फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करीत आहे. आदितीने दोघांचेही फोटो शेअरल करताना, ‘#ग्रेटफुल’ असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही एकमेकांना डेट करत असून त्यांनी कधीच दोघांचं नातं जगापासून लपवून ठेवलं नाही. अनेकदा ते एकत्र स्पॉटही झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT