Prithvik Pratap Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prithvik Pratap: हास्यजत्रा फेम अभिनेत्याची नवी सुरूवात; लग्नाचे शेअर केले Photos

Prithvik Pratap Married: पृथ्वीकने त्याच्या चाहत्यासोबत आनंदाची बातमी शेअर केलीय. पृ्थ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा लोकप्रिय कार्यक्रम कलाकारांमुळे कायमच चर्चेत असतो. आपल्या विनोदी शैलीने या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केलं आहे. या कलाकारांपैकी पृथ्वीक प्रताप हा त्याच्या अनोख्या अंदाजाने कायमच चर्चेत असतो. मराठीसह हिंदीमध्ये पृथ्वीकने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. नुकंतच पृथ्वीकने त्याच्या चाहत्यासोबत आनंदाची बातमी शेअर केलीय. पृ्थ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे.

सोशल मीडियावर पृथ्वीकने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. पृथ्वीकने प्राजक्ता वायकुळ हीच्याशी लग्न केले आहे. फोटो शेअर करत पृथ्वीकने, एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने,साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!असं कॅप्शन दिलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात या दोघांनी वेडिंग खास फोटोशूट केलं आहे. ट्रेडिशनल लूकमध्ये दोघेंही अत्यंत सुंदर दिसत आहेत.

सोशल मीडियावर पृथ्वीकच्या पोस्टवर चाहत्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.पृथ्वी प्रतापच्या या नव्या पोस्टला चाहत्यांसह सेलिब्रिटी मंडळी ही शुभेच्छा देत आहे व त्याचे अभिनंदन करत आहेत. अभिनेता चेतन वडनेरे, जितेंद्र जोशी, प्रिया इंदलकर, इशा डे, श्रुती मराठे, निखिल बने, रूपाली भोसले, स्पृहा जोशी, सखी गांधी, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, प्रथमेश परब, सई ताम्हणकर, तनवी बर्वे यांसारख्या सेलिब्रिटींनी पृथ्वी प्रतापच्या पोस्टवर कमेंट करा शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT