मनोरंजन बातम्या

'देसी देसी न बोल्या कर...' फेम प्रसिद्ध गायकाचं निधन, वयाच्या ४०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pooja Dange

हरियाणाचा प्रसिद्ध गायक राजू पंजाबी याचं मंगळवारी सकाळी निधन झाले. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या राजूला हिसार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास सिंगर राजू पंजाबी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

हरियाणवी गायक राजू पंजाबी 40 वर्षांचे होते. राजूला कावीळ झाली होती आणि त्यामुळे सुमारे 10 दिवस त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

राजू पंजाबी त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत चालल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते पण मंगळवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला.

राजू अचानक निघून गेल्याच्या वृत्ताने त्याच्या चाहत्यांनी खूप दुःख झाले आहे. हरियाणा संगीत उद्योगात शोककळा पसरली असून राजूच्या निधनामुळे सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रावतशर, जिल्हा हनुमानगढ, राजस्थान येथे मूळ गावी राजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते हिस्सारच्या आझादनगरमध्ये राहत होते. सध्या त्यांचे चाहते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी जात आहेत.

राजू केवळ हरियाणामध्येच नाही तर पंजाबमध्येही खूप लोकप्रिय होता. त्यांची गाणी तरुणाईला खूप आवडतात आणि सपना चौधरीसोबतची त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. 'देसी देसी' व्यतिरिक्त त्यांची 'सँडल', 'सॉलिड बॉडी', 'तू चीज लाजवाब', 'थडा भरतर', 'स्वीटी' ही गाणीही खूप गाजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT