Hardik Pandya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं मुंडण; माहिका शर्मासोबत तिरुमला मंदिरात घेतले श्री वेंकटेश्वरांचे दर्शन

hardik pandya: दुखापतीतून सावरणारा हार्दिक पांड्या माहिका शर्मासोबत तिरुमला मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. मुंडण केलेल्या लूकमुळे तो चर्चेत आला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरण्यावर लक्ष देत असून क्रिकेटपासून काही काळ दूर आहे. मात्र, याच दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी हार्दिक मुंडण केले असून चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

वृत्तसंस्था पीटीआय (PTI) ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या पारंपरिक पांढऱ्या रंगाचा धोतर आणि कुर्ता परिधान करून मंदिरात दर्शन घेताना दिसतो. त्याच्यासोबत असलेली माहिका शर्माने पांढऱ्या रंगाचा सलवार-सूट परिधान केला होता. दोघांनीही श्री वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेत प्रार्थना केली.

हार्दिकच्या नव्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः त्याने केलेल्या मुंडणामागचे कारण काय, याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. तिरुमला मंदिरात भाविकांकडून केस अर्पण करण्याची अनेक वर्षांची धार्मिक परंपरा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर किंवा श्रद्धेपोटी अनेक भक्त येथे मुंडण करून केस अर्पण करतात. हार्दिकनेही एखादा नवस पूर्ण झाल्यानंतर ही धार्मिक परंपरा पाळली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत हार्दिक किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दरम्यान, हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी मेहनत घेत आहे. दुखापतीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती. तसेच इंग्लंड दौऱ्यावरही तो भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यामुळे त्याच्या कमबॅक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT