Hardik Pandya Natasha Stankovic Divorce News In Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik-Natasa Divorce: डिवोर्सवर शिक्कामोर्तब! नताशा किती घेणार पोटगी? किती आहे हार्दिक आणि नताशाची एकूण संपत्ती?

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce News In Marathi: हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला आहे. आता चर्चा सुरू आहे, की नताशाला घटस्फोटावेळी किती रक्कम मिळणार? त्यासाठी या दोघांच्या नेटवर्थचीही माहिती घेतली जाते आहे.

साम टिव्ही ब्युरो

वैष्णवी राऊत, साम टीव्ही, प्रतिनिधी

अखेर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय. नताशाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांच्या वेगळे होण्याची माहिती दिली आहे. केवळ चार वर्षांत हार्दिक आणि नताशाचा संसार मोडला आहे. तोही, दोन वेळा थाटामाटात लग्न करून! त्यामुळे आता चर्चा सुरू आहे, की नताशाला घटस्फोटावेळी किती रक्कम मिळणार? त्यासाठी या दोघांच्या नेटवर्थचीही माहिती घेतली जाते आहे.

चार वर्षांचा संसार संपवण्याची घोषणा नताशा आणि हार्दिकने इन्स्टाग्रामवर केली. एक जॉईंट पोस्ट त्यांनी केली. ज्यावर लिहिलेलं आहे - "4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, हार्दिक आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सुखी संसारासाठी एकत्र प्रयत्न केले. आमचं सर्वकाही या नात्याला दिलं. आणि आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय आम्हा दोघांच्या हिताचा आहे. हा एक कठीण निर्णय होता.”

हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. अगस्त्य असं त्याचं नाव. नताशा आणि हार्दिकच्या वेगळे होण्याने अगस्त्यचं काय होणार? असा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना पडला. त्यामुळे अगस्त्यबद्दलही या पोस्टमध्ये आवर्जून लिहिलंय. या पोस्टमध्ये सांगितलंय, की अगस्त्य हा दोघांच्याही जीवनाच्या केंद्रस्थानी राहील. त्याच्या आनंदासाठी नताशा आणि हार्दिकने 'सह-पालक' राहण्याचा निर्णय घेतलाय.

किती आहे हार्दिक आणि नताशाची एकूण संपत्ती?

हार्दिक आणि नताशा दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. हार्दिक भारतीय क्रिकेट संघात आहे. तर नताशाही यशस्वी मॉडेल आहे. ती बॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. अनेक गाणी आणि भूमिका तिने केल्या आहेत. गायत बादशाहसोबत 'डिजेवाले बाबू' या गाण्याच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

या माजी जोडप्याची एकत्रित संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातही सामूहिक संपत्तीमध्ये हार्दिकचा मोठा वाटा आहे. अनेक अहवालांनुसार, मार्च 2024 पर्यंत हार्दिकची एकूण संपत्ती 91 कोटी होती. नताशा स्टॅनकोविकबद्दल सांगायचं झाल्यास, अहवालात तिची एकूण संपत्ती 20 कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आता दोघांनीही विभक्त होण्याचंं तर जाहीर केलं आहे. पण यामध्ये पोटगी म्हणून नताशाला किती रक्कम दिली जाणार हे अजूनतरी स्पष्ट नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT