Hardeek Joshi New Movie Club 52 Instagram
मनोरंजन बातम्या

Hardeek Joshi Announcement: राणादा खेळणार ‘एक डाव नियतीचा’, ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर अभिनेत्याची रुपेरी पडद्यावर एन्ट्री

Hardeek Joshi New Movie Announcement: सध्या हार्दिक जोशीच्या एका नव्या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Hardeek Joshi New Movie Club 52

सोशल मीडियावर रोज नवनव्या चित्रपटांची घोषणा केली जात आहे. त्यासोबतच अनेक मराठी चित्रपटांचीही बॉक्स ऑफिसवर चलतीही पाहायला मिळत आहे. कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या हार्दिक जोशीच्या एका नव्या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

नुकताच चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट येत्या १५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ चित्रपटाचे टीजर पोस्टर प्रचंड चर्चेत आले आहे.

‘एक डाव नियतीचा’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या चित्रपटाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून चित्रपटाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे.

अमित कोळी दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकुर करीत आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि निर्मित हा चित्रपट १५ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. गीतलेखन अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी केले आहे. तर आदित्य बेडेकरने पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. (Actors)

नुकतंच जुलै महिन्यात हार्दिक जोशी आणि त्याची पत्नी अक्षया देवधरसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे या सर्वांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT