Hum Do Hamare Baarah  Saam TV
मनोरंजन बातम्या

Hum Do Hamare Baarah: 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने दिली परवानगी;काय होता वाद ?

Hum Do Hamare Baarah Movie News: 'हमारे बारह' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'हमारे बारह' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील लोकसंख्या वाढीविषयी ठळक वर्णन केले आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायलयाने मंजुरी दिली आहे.

चित्रपटात काही बदल करण्यास निर्मात्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळेच हमारे बारह चित्रपटाच्या प्रदर्शनास मंजुरी दिली आहे. बदल केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यास हरकत न घेण्याचे याचिकाकर्त्यांकडून मान्य करण्यात आले आहे. आज दुपारी १.३० वाजता न्यायालय याबाबत आदेश देणार आहे.

'हमारे बारह' या चित्रपटात एका विशिष्ट समाजाला दोष देण्यात आला आहे. त्यामुळे जातीय तेढ टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या चित्रपटावर बंदी घातली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता चित्रपटात काही बदल करण्यास निर्मात्यांनी होकार दिला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

चित्रपटात एका समाजाचे आक्षेपार्ह वर्णन केले असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. लोकसंख्या वाढीचे एकदम ठळक वर्णन केले होते. हे सीन्स चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. परंतु आता चित्रपटातील काही सीन्स बदल करण्याची मागणी निर्मात्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनासाठी परवानगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madgaon Tourism: माथेरान-महाबळेश्वर नक्कीच विसराल, मडगांवपासून ३ तास दूर आहे हे हिल स्टेशन

Money Scam : टोरेसनंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा, १५० जणांना कोट्यवधींना गंडवले, वाचा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : जळगाव उन्हाचा तडाखा वाढला, शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश

Badlapur: बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, सोनोग्राफी सेंटर पोलिसांकडून सील

Breaking Mangalsutra Meaning: बायकोचं मंगळसूत्र तुटलं, नेमकं संकेत काय?

SCROLL FOR NEXT