Guru Randhawa Injured Saam Tv
मनोरंजन बातम्या

Guru Randhawa Injured: ॲक्शन सीन करताना सेटवर अपघात; गायक गुरू रंधावाला गंभीर दुखापत, फोटो व्हायरल

Guru Randhawa Injured: गुरु रंधावाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या या फोटोने चाहत्यांना चिंतीत केले आहे.

Shruti Vilas Kadam

Guru Randhawa Injured: प्रसिद्ध गायक गुरु रंधावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्याने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या डोक्यावर पट्टी आहे. मानेवर एक नेक ब्रेस देखील आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रंधावा जखमी झाला.

गुरु गेल्या काही काळापासून 'शौनकी सरदार' या पंजाबी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील एका अ‍ॅक्शन सीनचे चित्रीकरण करताना तो जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. हा फोटो शेअर करताना गुरु रंधावाने लिहिले की, “माझा पहिला स्टंट, पहिल्यांदाच दुखापत झाली, पण मी प्रेक्षकांसाठी कठोर परिश्रम करेन.”

या फोटोने त्याचे सर्व चाहते चिंतेत आहेत. लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. त्याच्या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. अनुपम खेर यांनी लिहिले, “तू कमाल आहे. लवकर बरे व्हा.” जॅकलीनने लिहिले, “लवकर बरे व्हा गुरुजी.” सौम्या टंडन म्हणाली, “अरे देवा. स्वतःची काळजी घे आणि लवकर बरे व्हा.” 'शौनकी सरदार' चित्रपटात गुरु रंधावासोबत बब्बू मान, निम्रित कौर अहलुवालिया आणि गुग्गु गिल हे कलाकारही दिसणार आहेत.

या चित्रपटात गुरु रंधावा यांनीही काम केले आहे.

गुरु रंधावा हे संगीत विश्वातील एक मोठे नाव आहे. त्याने आपल्या आवाजाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. गायनात मोठी उंची गाठल्यानंतर, त्याने गेल्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचा एक चित्रपट 'कुछ खट्टा हो जाए' नावाने प्रदर्शित झाला होता, यामध्ये गुरु मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याच्यासोबत सई मांजरेकर आणि अनुपम खेर सारखे स्टार्सही दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

SCROLL FOR NEXT