Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss : बिग बॉसच्या घरात सदावर्तेंची हवा, चक्क हिरेजडीत सूट घातला; किंमत ऐकून बसेल धक्का!

Gunaratna Sadavarte : बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून गुणरत्न सदावर्ते हे चर्चेत आहेत. परखड बोलून आपली मतं ते मांडत आहेत.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस 18' ची (Bigg Boss) चर्चा पाहायला मिळत आहे. हे पर्व खूप गाजत आहे. या सीझनमध्ये खूप तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस' च्या पहिल्या दिवसापासून गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) बिग बॉसच्या घरात राडा घातला आहे.

हळूहळू गुणरत्न सदावर्ते हे घरात रमू लागले आहे. त्यांची काही सदस्यांसोबत मैत्री होत आहे. आता बिग बॉसच्या घरात जेलमध्ये तजिंदग बग्गा हे आहेत, जे सदावर्ते यांचे मित्र आहेत. घरात या दोघांची छान मैत्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसकडे तजिंदग बग्गा यांना जेलमधून काढण्यासाठी सांगत आहेत.

आज 'बिग बॉस 18'चा पहिला 'विकेण्ड का वार' होणार आहे. बिग बॉसच्या घरात सदावर्तेंनी खूप खास लूक केला आहे. त्यांनी दीड लाखांचा हिरेजडीत काळा रंगाचा सूट घातला आहे. हा सूट घालून ते स्वॅगमध्ये घरात वावरत आहे. त्यांची घरात एन्ट्री झाल्यापासून ते सर्वांशी कायद्याच्या भाषेत बोलत आहेत. गुणरत्न सदावर्तेंनी घरातील सदस्यांशी बोलताना सांगितले की, हा सूट दीड लाखांचा आहे. तसेच या सूटविषयी सदावर्ते हे सूटवर असलेल्या हिऱ्यांविषयी हेमाला सांगताना पाहायला मिळत आहे.

पहिल्या आठवड्यात करण मेहरा, चाहत पांडे, मुस्कान बामने, अविनाश मिश्रा आणि गुणरत्न सदावर्ते हे 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेट झाले आहेत. आज सलमान खानच्या 'विकेण्ड का वार'मध्ये काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कोण होणार घराबाहेर आणि सदावर्तेंना सलमान काय बोलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

SCROLL FOR NEXT