Oscar Award 2023
Oscar Award 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Oscar Award 2023: पुरस्कारासाठी चर्चा एकाची, पुरस्कार भलताच घेऊन गेला…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Oscar Award 2023 : ऑस्कर (Oscar 2023) हा चित्रपटक्षेत्रात (Film Industry) अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार सिनेसृष्टीत आणि त्यातील संबंधित घटकांना दिला जातो. यंदाच्या 2023 च्या नामांकनांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी ऑस्करसाठी भारतातून 'छल्लो शो' (Chhello Show) या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. बॉलिवूडचे 'कश्मिर द फाईल्स' (The Kashmir Files) आणि 'आरआरआर' (RRR) या चित्रपटांची चर्चा सूरु असतानाच 'छल्लो शो' ने ऑस्करवर आपले नाव कोरले आहे.

अनेक दिवसांपासून एसएस राजमौलींच्या आरआरआर सोबतच विवेक अग्निहोत्रींच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या सर्वत्रच चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सिनेमाने सर्वांना मागे टाकत 'छल्लो शो' ने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा एक गुजराती चित्रपट असून याचे दिग्दर्शक पॅन नलिन आहेत. चित्रपटाची कथा एका गावातील नऊ वर्षाच्या मुलावर आधारित असून त्याचे चित्रपटावर खूप प्रेम आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला होता तसेच नंतर अनेक पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात आला होता.

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir File) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला ऑस्करसाठी समर्थन केल्याबद्दल तसेच चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Health: शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; आमदार रोहित पवारांनी दिली महत्वाची माहिती

MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

Amravati News : शिवपुराण कथेच्या कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू

Marathi Vs Gujarati News | गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसांना बंदी, ठाकरे गटाचा आरोप

Hair Care Tips: केसांचा Freezyness घालवण्यासाठी 'या' सेप्या टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT