Riteish Deshmukh-Genelia D'Souza Saam TV
मनोरंजन बातम्या

Ritesh- Genelia: जिनिलीयाचा रितेशसाठी हटके उखाणा, 'तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा...'

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.

Chetan Bodke

Ritesh- Genelia: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्या तो आणि त्याची पत्नी जिनिलीया 'वेड' चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

चित्रपटीतील रितेश- जिनिलीयाची लव्ह केमिस्ट्री पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत. ही लाडकी जोडी नेहमीच प्रेक्षकांना फार आवडते, त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. रितेश- जिनिलीयाने आता पर्यंत दोन मराठी चित्रपटांत आणि काही हिंदी चित्रपटांत एकत्र काम केले आहेत. जिनिलीयाही बऱ्याचदा रितेशबरोबर मराठीतून संवाद साधताना दिसते.

आता चक्क तिने रितेशसाठी भर कार्यक्रमात मराठमोळ्या शैलीत उखाणा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी 'सकाळ स्वास्थ्यम्' हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. या कार्यक्रमाला अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही उपस्थित होते.

या संवादादरम्यान जिनिलीयाला "तुझ्याकडून आम्हाला एक खास उखाणा ऐकायला आवडेल." असे सांगितले. त्यावेळी जिनिलीयाने पती रितेशसाठी खास उखाणा घेतला.

या कार्यक्रमात जिनिलीयाने पती रितेशसाठी उखाणा घेतला, “तुम्ही माझ्यासोबत असलात की मला स्वतःच्या आधाराची गरज नाही, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही.” तिच्या या खास उखाण्याने सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. तर या हटक्या उखाण्याने रितेशही खुश झाला.

तेश 'वेड' चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून जिनिलीया या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रितेश- जिनिलीयासोबतच, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटातील गाणी महाराष्ट्राची लाडकी जोडी अजय- अतुल यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT