Gautami Patil Dance Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, तरुणांची हुल्लडबाजी; थेट बॅरिगेट्स तोडत...

एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या तुफान गर्दीत तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pandharpur News: लावणी कलावंत गौतमी पाटील सध्या महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या दिलखेचक अदांनी आणि धमाकेदार डान्सने तिने तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी पाहायला मिळते. अलिकडेच तिच्या नातेपुतेमधील कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याची बातमी समोर आली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे तिच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी चर्चेचा विषय ठरत आहे. या तुफान गर्दीमुळे तरुणांची मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते मध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. यावेळीही असाच प्रकार पाहायला मिळाला.

यावेळी तरुणांनी गोंधळ घालत पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडून पुढे येण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (latest Marathi News)

दरम्यान, आपल्या डान्सने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. घुंगरु या मराठी चित्रपटात (Marathi Movie) झळकणार असल्याची माहिती तिने अलिकडेच दिली होती. आता गौतमीच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

SCROLL FOR NEXT