Gautami Patil SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil : गौतमी पाटील,अलका कुबल अन् सई ताम्हणकर स्क्रिनवर एकत्र झळकणार? 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Gautami Patil Video :गौतमी पाटीलने नुकतीच अलका कुबल, सई ताम्हणकर आणि शिव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil ) नेहमीच आपल्या डान्समुळे चर्चेत असते. तिच्या दिलखेच अदांनी चाहते घायाळ होतात. गौतमीचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. तिने अनेक चित्रपटात देखील आपल्या नृत्याने सिनेमाची शान वाढवली आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढतच जात आहे.

आता गौतमी पाटील एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमीने पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal ) , सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) आणि अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare ) यांची भेट घेतली आहे. यांच्यासोबतचा भेटीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तिघांसोबत गौतमी स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रेक्षक या सर्वांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अलका कुबल, सई ताम्हणकर आणि शिव ठाकरे यांच्यासोबत गौतमी छान गप्पा मारताना पाहायला मिळत आहे. तिने पोस्टला कॅप्शनही तसेच खास दिलं आहे. गौतमीने कॅप्शनमध्ये लिहिलं की,"सगळ्यांना भेटून खूप छान वाटले" गौतमीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. आता गौतमी पाटील नवीन कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT