Limbu Firawla Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Limbu Firawla Song: गौतमी पाटीलनं अमेय वाघला केलं किस, आता लिंबू फिरवणार!

gautami patil Dance In Movie: गौतमी पाटीलचं नवं गाणं रिलीज झालं आहे. ज्यामध्ये गौतमीच्या नृत्यानं पुन्हा एकदा नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

Manasvi Choudhary

दिलखेचक सौंदर्य आणि नृत्यातील अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गौतमी पाटीलचं नवं गाणं रिलीज झालं आहे. ज्यामध्ये गौतमीच्या नृत्यानं पुन्हा एकदा नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

गौतमी पाटीलचं नवं गाणं आलं आहे. 'लिंबू फिरवला' असं गाण्याचं नाव आहे. लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटातील हे पहिलं गाणं असून चित्रपटात गौतमीची झलक दिसणार आहे. गौतमी या गाण्यातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे ऐकायला जितके जल्लोषमय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. 'लिंबू फिरवलंय' या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे.

लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटातील 'लिंबू फिरवला' हे गाण्यावर गौतमीने अभिनेत अमेय वाघसोबत डान्स केला आहे.दोघांच्या भन्नाट नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. गौतमी पाटील आणि अमेय वाघ लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटात अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे देखील असणार आहेत. येत्या १८ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारू उधार न दिल्यानं मनमाडमध्ये बारमालकावर जीवघेणा हल्ला | CCTV

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजुर

Bengali Sandesh Recipe: स्वीट डिश खायला आवडते मग एकदा घरी बंगाली सोंदेश नक्की ट्राय करा

Cancer symptoms: महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातच १४५०० महिलांमध्ये कॅन्सरसारखी लक्षणं, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra Politics : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT