Gauri Khan  Instagram/@gaurikhan
मनोरंजन बातम्या

Gauri Khan Trolled: गौरी खान झाली एका साध्या फोटोमुळं ट्रोल, चाहत्याने बाजू घेत मांडली नेटकऱ्यांसमोर बाजू

फोटो एडिट केल्याने गौरी खान होतेय ट्रोल.

Saam Tv

Gauri Khan Photo Get Viral: बॉलिवूडच्या किंग खानसह त्याचे संपूर्ण कुटुंब नेहमी चर्चेत असत. 'पठान' चित्रपटामुळे शाहरुखवर फॅन्सच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे. तर त्याची पत्नी, प्रोड्युसर आणि इंटिरियर डिझायनर गौरी खान ट्रोल होत आहे.

गौरी खान नुकतीच मुलगी सुहानासह दुबईमधील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील फोटो गौरीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये या दोघींसह शनाया कपूर देखील दिसत होती.

Redditने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये गौरी फोटोंची तुलना त्यांनी केली आहे. गौरीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो एडिटेड आहेत असे या वेबसाईटचे म्हणणे आहे. गौरिन्यू पोस्ट केलेलं हे फोटो तिने हजेरी लावलेल्या दुबईतील त्याच कार्यक्रमातील आहेत.

गौरी खानने शेअर केलेल्या फोटोंची Getty Images या वेबसाईटने पोस्ट केलेल्या ओरिजिनल फोटोंची तुलना केली जात आहे. या दोन्ही फोटोंमध्ये गौरी थोडी वेगळी दिसत आहे.

गौरीने तिचे फोटो पोस्ट करताना ते एडिट केलेलं असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. गौरीचे चाटे तिच्या मदतीला धावून आले आहेत आणि तिच्यावतीने बाजू मांडत आहेत.

गौरीच्या एका चाहत्याने म्हटले आहे की, 'यात काय मोठं आहे.' तर एका चाहत्याने लिहिले की, 'सेलिब्रेटी नसलेले देखील फोटो एडिट करतात. म्हणूनच ब्युटी अॅप्स आणि फिल्टर्स अस्तित्वात आहेत,' तसेच एका चाहत्याने "आपणही तेच केलं असत जर घरातून बाहेर पडताना प्रत्येक वेळी 100 कॅमेरे आपल्यावर रोखलेले असते तर . साहजिकच प्रत्येकवेळी चांगले दिसण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव असतो."

इंटिरियर डिझायनर असणारी गौरी एक निर्माती देखील आहे. अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला डार्लिंग्स या तिच्या निर्मितीत बनला होता, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि विजय वर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT