Maharashtrachi Hasya Jatra New Season Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra New Season : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे नवे पर्व सुरू होणार; यावेळी कोणकोणते कलाकार पोटधरून हसवणार?

Gaurav More Post : गौरव मोरेने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Gaurav More Share Update Of Maharashtrachi Hasya Jatra :

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही विनोदी मालिका खूप लोकप्रिय आहे. या मालिकेतेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षा काहीसे उदास आहेत आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे जुने एपिसोड पाहून प्रेक्षक स्वतःचे मनोरंजन करत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी आहे. या कार्यक्रमातील कलाकार गौरव मोरेने ही बातमी सांगितली आहे.

गौरव मोरेने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ईशा डे, शिवली परब, दत्तू मोरे आणि प्रियदर्शनी दिसत आहेत. त्यांच्या घरात खूप गरिबी असल्याने ते सर्व आनंदाचे दिवस परत कधी येणार याची वाट पाहत आहेत.

तर व्हिडीओमध्ये पुढे समीर चौगुले आणि वनिता खरात येतेय आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद आणतात. हे सर्व खूप विनोदी प्रद्धतीने दाखविण्यात आले आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ एक खूप मोठी घोषणा करण्यासाठी केला आहे. गौरवने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेआहे की, 'पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत… पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - सहकुटुंब हसू या! 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा.' (Latest Entertainment News)

याचाच अर्थ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्याची सगळेजण खूप उत्सुकतेने वाट पाहत होते. या पर्वात कोण-कोणते विनोदवीर असणार हे अद्याप समजलेले नाही. पण हास्याचा धमाका असणार हे निश्चित.

मे महिन्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. ब्रेक घेऊन हे सर्व कलाकार अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील विविध व्हिडीओ आणि अनुभव सर्व विनोदवीर शेअर करत होते.

दौरा संपवून सर्वजण परतले असून नव्या जोमाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसणार आहेत. जवळ जवळ अडीच महिन्यांनी हे सर्वजण आपल्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT