Samantha Ruth Prabhu Top Rating Films Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu Birthday: अभिनेत्रीचे 'हे' आहेत टॉप रेटिंग चित्रपट, एक नंबरला तर तोडच नाही...

दाक्षिणात्य सिने सृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी समांथाचा २८ एप्रिल रोजी वाढदिवस. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया टॉप रेटिंग चित्रपटाबद्दल...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samantha Ruth Prabhu Top Rating Films: दाक्षिणात्य सिने सृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी समांथाचा २८ एप्रिल रोजी वाढदिवस. समांथा २८ एप्रिल रोजी ३५ वर्षाची होत आहे. समंथा रूथ प्रभूला तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटात अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर भारतीय श्रोते आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात नावाजले गेले आहे. अलीकडेच आलेल्या तिच्या ‘शाकुंतलम’मध्ये तिच्या लूकचे कौतुक झाले होते. एस. एस. राजामौलीसोबत ‘ईगा’मध्ये काम केलेल्या समंथाने प्राईम व्हिडिओवरील एक्शन थ्रिलर असलेल्या ‘द फॅमिली मॅन’च्या दुस-या सीजनसह ओटीटीवर पदार्पण केले.

सध्या ती ‘सिटाडेल: इंडिया’च्या शूटींग व्यग्र आहे व त्या वेबसीरीजमध्ये समांथा वरूण धवनसोबत पडद्यावर दिसणार आहे. ‘सिटाडेल: इंडिया’मध्ये समांथाने बरीच मेहनत घेतली असून सध्या तिची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. नुकतीच तिला वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान तिच्या हाताला दुखापत झाली होती.

Samantha Ruth Prabhu IMDB Top Rating Films

समांथाच्या ग्लॅमरस अंदाजाची चर्चा फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर संपूर्ण भारतात होते. मध्यंतरी तब्येतीमुळे तिने या प्रोजेक्टला नकार दिल्याच्या चर्चा देखील बऱ्याच रंगल्या होत्या. मात्र ती ‘सिटाडेल: इंडिया’या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज आणि डीके या सुप्रसिद्ध जोडीने केले असून मध्यंतरी चित्रपटाची शूटिंग नैनितालमध्ये सुरू होते. तिथे चित्रीकरणादरम्यान समांथाच्या हाताला दुःखापत झाली होती. या वेबसीरिजमध्ये समांथा ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

उद्या अर्थात २८ एप्रिलला प्राईम व्हिडिओवर प्रियंका चोप्रा- जोनस प्रमुख भूमिकेत असलेली ‘सिटाडेल’ वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. आणि समांथा रूथ प्रभू ‘सिटाडेल: इंडिया’या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

IMDb वरील समंथा रूथ प्रभूची सर्वाधिक रेटींग असलेली टॉप 10 कलाकृती

1. द फॅमिली मॅन - 8.7

2. महानाती - 8.4

3. सुपर डीलक्स - 8.3

4. रंगस्थलम - 8.2

5. कठ्ठी - 8.1

6. मनम - 7.9

7. 24 - 7.8

8. गूदाचारी - 7.8

9. एगा - 7.7

10. ये मय्या चेसावे - 7.7

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीची १७ जागांवर घसघशीत आघाडी

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं निधन

Former MLA Rahul Bondre : काँग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांनी बजावली नोटीस, १५ दिवसांत मागितलं उत्तर; नेमकं प्रकरण काय?

झाडूविषयीचे 7 महत्त्वाचे वास्तू नियम! धनसंपत्ती आणि सुख-समृद्धीसाठी फायदेशीर

मोठी बातमी! महिलांच्या ७ योजनांना कात्री; ४ गुंडाळल्या, ३ बंद होणार; लाडकी बहीण योजनेचं काय झालं?

SCROLL FOR NEXT