Friday Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Friday Release: जुलैचा शेवटचा शुक्रवार मनोरंजनाने भरलेला; 'हे' चित्रपट - सिरीज होणार प्रदर्शित

विविध जॉनरचे चित्रपट लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

Shivani Tichkule

मुंबई - जुलै महिन्याचा शेवटचा शुक्रवार मनोरंजन जगतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण सिनेमांव्यतिरिक्त OTT प्लॅटफॉर्मवरही अनेक उत्तम चित्रपट (Movie) आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. यावेळी विविध जॉनरचे चित्रपट लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

एक व्हिलन रिटर्न्स

प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून 'एक व्हिलन'च्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. जॉन अब्राहम, दिशा पटानी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरीने केले आहे. याआधी त्याने अनेक सुपरहिट थ्रिलर चित्रपट बनवले आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे देखील पाहा -

गुड लक जेरी

या शुक्रवारी जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.हा चित्रपट 2018 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे. कॉमेडी, क्राइम आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटात एका मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. जी अमली पदार्थांच्या तस्करीच्या व्यवसायात उतरते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 29 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट कधीही प्रदर्शित केला जाऊ शकते.

777 चार्ली

थिएटरमध्ये लोकांची प्रशंसा लुटल्यानंतर, '777 चार्ली' हा चित्रपट ओटीटीला धूम ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. माणूस आणि प्राण्यांच्या नात्याची सुंदर कथा सांगणारा हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर आता तुम्ही घरी बसून हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट 29 जुलै रोजी Voot वर प्रदर्शित होणार आहे.

रंगबाज

चित्रपटांव्यतिरिक्त, तुम्ही या वीकेंडला वेब सीरिजचाही आनंद घेऊ शकता. यावेळी राजकारणावर आधारित रंगबाज या वेबसिरीजचा तिसरा सीझन प्रदर्शित होत आहे. ही वेब सिरीज २९ जुलैला Zee5 वर स्ट्रीम करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

Pithla Bhakri Recipe: पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी बनवा झणझणीत पिठलं-भाकरी

SCROLL FOR NEXT