Parmesh Mali News Social Media
मनोरंजन बातम्या

Singer Parmesh Mali News: 'एकच वादा' फेम गायक परमेश माळीची आर्थिक फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

आर्थिक फसवणुकीचा असाच एक प्रकार एकच वादा 'फेम' गायक परमेश माळी याच्यासोबत देखील झाला आहे.

Vishal Gangurde

Parmesh Mali News: देशभरात नोकरी लावून देतो, पैशे द्या, असं आमिष देणाऱ्या व्यक्तींचा सुळसुळाट झाला आहे. अशा व्यक्तींकडून पैसे घेऊन कामे केली जात नाहीत. अशा पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. या व्यक्तींच्या बोलण्याला सामान्य नागरिक बळी पडतात. आता कलाकार मंडळीही बळी पडू लागले आहेत. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. आर्थिक फसवणुकीचा असाच एक प्रकार एकच वादा 'फेम' गायक परमेश माळी याच्यासोबत देखील झाला आहे. (Latest Marathi News)

परमेश माळीने भावाच्या नोकरीसाठी एकाला २५ हजार रुपये दिले. अनेक दिवसांनंतरही परमेशचे काम झाले नाही. त्यामुळे परमेशला स्वत:ची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर परमेशने सोशल मीडियावर पोस्ट लिहून फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे .

परमेश माळीने फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं की, 'नमस्कार! नागरिकांनो सावधान, कल्पेश जाधव नावाचा एक व्यक्ती आहे. तुम्हाला पहिल्यांदा कॉल करणार. तुम्हाला नावाने हाक मारणार. त्यानंतर आपल्या व्यवसायाबद्दल बोलत राहणार. त्यामुळे आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्या जवळचाच आहे. त्यानंतर सांगणार की, मी रेल्वेमध्ये नोकरीला लावतो, त्यानंतर कागदपत्रे व्हाट्सअप करण्यास सांगतो. व्हाट्सअप केल्यानंतर तो ऑनलाइन पेमेंट करायला सांगतो, पेमेंट आला की फोन बंद करतो'. (Singer Parmesh Mali Latest News)

'मला आता समजला आहे की, या व्यक्तीने खूप लोकांची फसवणूक केली आहे. आज मीही त्याला बळी पडलो. मला माझ्या भावाला नोकरीला लावायचं होतं,म्हणून मीही 25 हजार रुपये त्याला पाठवले आणि त्याने फोन बंद केला, अशी माहिती परमेश माळीने दिली.

'त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा आणि पोलीस बांधवांना एक विनंती करतो की लवकरात लवकर या व्यक्तीवर कारवाई करा, नाहीतर हा अनेक गोरगरिबांना लुटू शकतो, असेही परमेशने पुढे सांगितले.

कोण आहे परमेश माळी?

परमेश माळी प्रसिद्ध गायक आहे. परमेश आगरी कोळी गीते गातो. परमेश माळीचा ऑर्केस्ट्रा फेमस आहे. परमेशने गायलेलं 'एकच वादा, राजू दादा', हे गाणं प्रचंड गाजलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT