Konkan Hearted Girl And Onkar Bhojane Meet Saam Tv
मनोरंजन बातम्या

Konkan Hearted Girl: “अन् “त्या” नंतर “ते” दोघं भेटले. ” ओंकारला पाहून ‘कोकण हार्टेड गर्ल’ झाली लाजून चुर्ररर...

Konkan Hearted Girl And Onkar Bhojane Meet: खरं तर माझी क्रश वैगेरे कोणी नाही. पण मला एक सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सर आहे, ती फार आवडते.

Chetan Bodke

Kokan Hearted Girl And Onkar Bhojane Meet: उत्तम अभिनय आणि दमदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या ओंकार भोजनेची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘फू बाई फू’ या कॉमेडी शो मधून त्याने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने सकाळ डिजिटलला मुलाखत दिली होती. त्यावेळी मुलाखतीत त्याने त्याच्या ‘क्रश’बद्दल सांगितले.

ओंकार भोजनेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘फू बाई फू’ मुळे विशेष लोकप्रियता मिळाली, सोबतच त्याने काही चित्रपटांत देखील प्रमुख भूमिका साकारली. सोबतच ओंकार भोजने ‘करून गेलो गांव’ या नाटकामुळे कमालीचा चर्चेत होता. या नाटकातं खास औचित्य साधत ओंकारने ‘सकाळ डिजिटल’सोबत दिलखुलास संवाद साधला. ओंकारला यावेळी तुझी कोण ‘क्रश’ आहे का ? असा प्रश्न विचारला.

त्यावेळी प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला होता की, “खरं तर माझी क्रश वैगेरे कोणी नाही. पण मला सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता प्रभू वालावलकर फार आवडते. सोबतच मी तिला सोशल मीडियावर फॉलोही करतो. मुळात मला तिचा स्वभाव आणि तिच्या बोलण्याची पद्धत मला फार आवडते. ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करते, त्या मुद्द्यांना चांगल्या पद्धतीने ती हाताळते, त्या मुळे मी तिचा फॅन आहे.”

याची सर्वत्र प्रचंड चर्चा झाल्यानंतर ही बातमी अगदी अंकितापर्यंत देखील पोहोचली. तेव्हा हे दोघे कधी भेटणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला अन् अंकिता- ओंकार भोजनेची भेट झाली. त्यांच्या भेटीचा फोटो यावेळी स्वतः अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या त्यांच्या दोघांच्या ही भेटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ओंकरला पाहून अंकिता फोटोत अक्षशः लाजून चूर झाली. अंकिताने या फोटोला “ “त्या” नंतर “ते” दोघं भेटले. ” अशा आशयाचं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

अंकिताने हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्स कमेंट करत म्हणतात, ‘अखेर तुला तुझा जोडीदार मिळाला..’, ‘बरं... कधी यायचं मग लग्नाला...’, ‘लग्नाची पत्रिका तर देणार ना?’, ‘किती गोड जोडा दिसतोय..’, ‘आली लग्न घटी समीप नवरा’ अशा कमेंट अंकिताच्या पोस्ट खाली आहे. तर एकाने ' तू दूर का.. हे गाणं अंकिता साठी होतं तर..' असं एकाने ओंकारला टोमणा मारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT