Fighter On OTT  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fighter Vs Animal: ओटीटीवर Fighterने अ‍ॅनिमलला पिछाडलं; नेटफ्लिक्सवर चालली ऋतिकची जादू

Fighter On OTT : ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोन यांचा फायटर चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fighter-Animal Fight On Netflix:

ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोनचा चित्रपट फायटर २५ जानेवारी २०२४ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस मोठा गल्ला जमा केला होता. या चित्रपटाने २१२.७३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही फायटरने धुव्वा उडवलाय. आता हा चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. आता विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने ओटीटीवरही 'ॲनिमल'सारख्या चित्रपटांना मात दिलीय. (Latest News)

१० दिवसात १२.४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले

'फायटर' हा चित्रपट २१ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ओटीटीवरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसप्रमाणे हिट ठरलाय. चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. अवघ्या १० दिवसांत चित्रपटाने १२.४ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. bollywoodnow ने आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिलीय.

bollywoodnowने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. ही पोस्ट शेअर करताना लिहिले होते की, #Fighter ला फक्त १० दिवसात नेटफ्लिक्सवर १२.४ मिलियन व्ह्यूज मिळालेत. जे असे करणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट आहे. एवढेच नाही तर पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोवर फायटरने अ‍ॅनिमलचा विक्रम मोडलाय.

युजरकडून कौतुक

या पोस्टवर एका युजरने फायटर सर्वोत्तम चित्रपट असल्याच म्हटलं आहे. दुसऱ्याने लिहिले की हा खूप सुंदर चित्रपट आहे. तिसऱ्याने लिहिले की येस फायटर खूप अप्रतिम आहे.

Fighter On OTT

बॉक्स ऑफिससह जगभरात ३६०कोटींचा गल्ला

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोन स्टारर 'फायटर' चित्रपट भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने ३६० कोटींचा गल्ला जमावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT