Rohit Bal Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rohit Bal Death: फॅशन डिझायनर रोहित बल याचं निधन,वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rohit Bal: प्रसिद्ध फॅशन डिझायनर बल याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध फॅशन डिझायनर बल याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं आहे. मागील अनेक वर्षापासून ते हृदयाच्या आजारांपासून त्रस्त होते. याचदरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला आहे. रोहित बल यांच्या निधनाने फॅशन इंडस्ट्रीत मोठा धक्का बसला आहे.

रोहित बल यांच्या निधनाने संपूण फॅशन इंडस्ट्री तसेच सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त केला जातोय. रोहित यांचा 13 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये 'कैनात: अ ब्लूम इन द युनिव्हर्स' हा शेवटचा शो झाला. अभिनेत्री अनन्या पांडे या कार्यक्रमाची शो-स्टॉपर होती. दरम्यान अनन्या सोबत रॅम्पवॉक देखील केला होता.

हे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर होते. मागील तीन दशकापासून अधिक ते फॅशन इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींसाठी फॅशनेबल आऊटफिट्स डिझाईन केले आहेत. रोहित बल यांचा जन्म ८ मे १९६१ मध्ये श्रीनगरमध्ये झाला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनींगचा कोर्स केला. २००१ मध्ये रोहित बल यांचा इंटरनॅशनल फॅशन अॅवार्ड मध्ये डिझायनर ऑफ द इयर म्हणून सत्कार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT