Shiv Thakare On Bigg Boss 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

मराठमोळ्या शिवचा भारतभर डंका, देशभरातील चाहत्यांनी 'Bigg Boss 16'च्या भावी विजेत्यासाठी काढली बाईक रॅली

'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरे सध्या दिवसेंदिवस चाहत्यांमध्ये कमालीचा चर्चेत आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare On Bigg Boss 16: 'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरे सध्या दिवसेंदिवस चाहत्यांमध्ये कमालीचा चर्चेत आहे. लवकरच बिग बॉसच्या हिंदीच्या १६व्या सिझनचा ग्रँड फिनाले मोठ्या दणक्यात पार पडणार आहे. मराठी बिग बॉस प्रमाणे हिंदी बिग बॉसमध्ये एका हिऱ्याप्रमाणे शिव सध्यासर्वत्र चमकत आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत एक खास व्हिडिओ शेअर केली आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओत त्याला चाहत्यांकडून मिळालेले भरभरुन प्रेम दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस हिंदीचा १६वा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या तरी शिव ठाकरेकडे संभाव्य विजेता म्हणूनच पाहिले जात आहे. बिग बॉसच्या घरापासून ते सर्वत्र त्याचीच हवा सुरु आहे. त्याचा परफॉर्मन्स हा नेहमीच चाहत्यांना प्रभावित करणारा ठरला आहे. त्याच्या चाहत्यांकडून सध्या तरी त्याला विजेता म्हणूनच घोषित केले आहे.

चाहत्यांकडून मिळालेले भरभरुन प्रेम पाहुन तो पुरता भारावुन गेला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिव ठाकरे म्हणतो, "सारा इंडिया कर रहा है जश्न की तैयारी. बस अब ट्रॉफी घर लाने की है बारी. संपूर्ण देशातून मिळत असलेल्या प्रेम आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे. #ShivSquad #ShivKiSena ने आयोजित केलेल्या बाइक रॅलीतील काही खास क्षणचित्रं." सोबतच त्याने यावेळी आपल्या चाहत्यांना भरभरुन मत देण्याचं आव्हाहन केले आहे.

नुकतेच गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरेच्या पोस्ट्सला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. नेहमी शिव ठाकरे सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या खास दमदार आण रुबाबदार शैलीतील अंदाजातील फोटोंना चाहते उत्तम प्रतिसाद देत असतात. गेल्या काही दिवसांपुर्वी शिवने सोशल मीडियावर १ मिलियन चाहते पुर्ण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यातील मानोरा मार्गावर भीषण अपघात; कार वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली

Mumbai Marathi Row: मुंबईत मराठीवरून राडा! शिंदेसेनेच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक, गाडीच्या चाकाची हवा काढली, नेमकं झालं काय?

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

SCROLL FOR NEXT