MC stan- Virat Kohli Saam tV
मनोरंजन बातम्या

MC Stan 'बिग बॉस'नंतर विराट कोहलीपेक्षा पॉप्युलर बनलाय? विराट-स्टॅनचे चाहते भिडले

जिथे एमसी स्टॅनचे इंस्टावर 8.8 मिलियन फॉलोअर्स आहेत, तिथे विराटला सर्वाधिक 236 मिलियन लोक फॉलो करतात.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : MC Stan ने रिअॅलिटी शो बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकली आहे. एकीकडे, एमसी स्टॅन विजेता झाल्याबद्दल त्याचे चाहते खूप खूश आहेत. तर काही जण तो ट्रॉफीसाठी लायक नाही असं म्हणत आहेत. मात्र या दरम्यान एमसी स्टॅनची फॅन फॉलोइंग इतकी मजबूत आहे की तो फार सक्रिय नसतानाही तो शो जिंकला.

लोकप्रियतेच्या बाबतीत एमसी स्टॅनने विराट कोहलीलाही मागे टाकल्याची चर्चा सुरु झाली आहे. शो जिंकल्यानंतर एमसीने सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आणि विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.सलमान खानसोबतच्या या पोस्टला रेकॉर्डब्रेक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

स्टॅनच्या या पोस्टवर आतापर्यंत 73 लाखांहून अधिक म्हणजेच 73,42,125 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर दीड लाखांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. बिग बॉसच्या कोणत्याही विजेत्या स्पर्धकाला आतापर्यंत इतके लाईक्स आणि कमेंट मिळालेल्या नाहीत. तेजस्वी प्रकाश आणि सिद्धार्थ शुक्ला यांसारख्या लोकप्रिय व्यक्तींनाही एमसी स्टॅनने मागे सोडले आहे.

एसी स्ट‌नच्या एका फॅनने तर त्यांची तुलना भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीशी केली आहे. विराटच्या पोस्टची तुलना एमसी स्टॅनच्या या पोस्टशी सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट्सशी केली. मात्र विराट आणि एमसी स्टॅनची तुलना अजिबात होऊ शकणार नाही हे सत्य आहे. कारण जिथे एमसी स्टॅनचे इंस्टावर 8.8 मिलियन फॉलोअर्स आहेत, तिथे विराटला सर्वाधिक 236 मिलियन लोक फॉलो करतात.

यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, विराट कोहलीला झोपलेला पाहून लोक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. एका यूजरने स्टॅन आणि विराटची तुलना न करण्याचा सल्ला दिला आहे.विराट कोहलीच्या एका पोस्टची कमाई स्टॅनच्या आयुष्यभराची कमाई ठरेल असं एका यूजरने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT