Abhradeep Saha : Saam tv
मनोरंजन बातम्या

Abhradeep Saha : लोकप्रिय युट्यूबरचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वी झाली होती सर्जरी

Abhradeep Saha dies : लोकप्रिय युट्यूबर अभ्रदीप साहा याचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन झालं आहे. अभ्रदीपच्या कुटुंबीयांनी बुधवारी त्याच्या निधनाची वार्ता कळवली.

Vishal Gangurde

मुंबई : लोकप्रिय युट्यूबर अभ्रदीप साहा याचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन झालं आहे. अभ्रदीपच्या कुटुंबीयांनी बुधवारी त्याच्या निधनाची वार्ता कळवली. अभ्रदीपच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.

अभ्रदीपच्या एका कुटुंबातील एका सदस्याने पोस्ट करत म्हटलं की, 'तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की, आज बुधवारी सकाळी १०.१८ वाजण्याच्या सुमारास अभ्रदीप साहा याचं निधन झालं. त्याचे लाखो लोक चाहते होते. त्याची खूप आठवण येईल'.

अभ्रदीप साहा हा कोलकातामध्ये राहत होता. अभ्रदीप हा कंटेंट क्रिएटर होता. गेल्या महिन्यात त्याला बेंगळुरुमधील एका रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. मात्र, मागील आठवड्यात त्याची तब्येत बिघडली. तो वेंटिलेटरवर होता. मल्टीपल ऑर्गन फेल्युरमुळे त्याचं निधन झालं.

अभ्रदीपचं इंग्लिश प्रीमियर लीग क्लबमधील 'नो पॅशन नो व्हिजन' हे विधान झालं. अभ्रदीप हा यूट्यूब चॅनेलवर क्रीडा, चित्रपट या विषयांवर व्हिडिओ तयार करायचा. त्याच्या युट्यूब चॅनलला ४.८ लाखांहून अधिक सब्सक्राइबर होते. त्याला इन्स्टाग्रामवर १२० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.

अभ्रदीपचं इंग्लिश प्रीमियर लीग क्लबमधील 'नो पॅशन नो व्हिजन' हे विधान झालं. अभ्रदीप हा यूट्यूब चॅनेलवर क्रीडा, चित्रपट या विषयांवर व्हिडिओ तयार करायचा. त्याच्या युट्यूब चॅनलला ४.८ लाखांहून अधिक सब्सक्राइबर होते. त्याला इन्स्टाग्रामवर १२० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.

इंडियन सुपर लीगच्या अनेक फुटबॉल क्लबने अभ्रदीपच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. Bengaluru FC ने पोस्ट करत म्हटलं की, 'अभ्रदीप साहाच्या निधनाच्या वार्ता कळाल्यानंतर दु:ख झालं. त्याचं खेळावर अतुट प्रेम होतं. त्याच्याकडे खूप जिद्द होती. त्याच्या आत्म्याला शांती मिळो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT