Bigg Boss Marathi 5 Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : सोशल मिडिया इन्फ्लुएंसरची ‘बिग बॉस मराठी’मध्ये होणार एंट्री, कोण आहे ती ?

Bigg Boss Marathi 5 Contestant : ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कोण आहे ती जाणून घेऊया...

Chetan Bodke

“तंटा नाय तर घंटा नाय...” हा डायलॉग रितेश देशमुखचा आज महाराष्ट्रातील घराघरांत तोंडपाठ झालाय. गेल्या काही दिवसांपूर्वी असा डायलॉग म्हणत ‘बिग बॉस मराठी ५’चा पहिला वहिला प्रोमो रिलीज झाला. यंदाच्या पाचव्या सीझनचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार नसून अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो कलर्स मराठीवर २८ जुलैपासून दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येईल. त्यादिवशी भव्य दिव्य ग्रँड प्रिमियर असेल. अशातच ‘बिग बॉस मराठी’मधील संभाव्य स्पर्धकांचे नावं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सर्वच प्रेक्षकांना ‘बिग बॉस मराठी’मध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार ? याची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया एन्फ्लूएंसरची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आता, पहिल्यांदाच फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी सेलिब्रिटींसोबत सोशल मिडिया एन्फ्लूएंसरही दिसणार आहेत. पहिल्यांदाच या सीझनला हा प्रयोग करण्यात आलेला आहे. काही तासांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी ५’च्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर पहिल्या स्पर्धकाचं नाव सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर ही ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

ही एक सोशल मिडिया एन्फ्लूएंसर असून तिचा इन्स्टाग्रामवर फार मोठा चाहतावर्ग आहे. अद्याप ‘बिग बॉस मराठी ५’मधील इतर स्पर्धकांची यादी जाहीर झालेली नाही. सोशल मीडियावर अनेक स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. २८ जुलैला अंकिता बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल की नाही, याबाबतची निश्चित माहिती शो सुरु झाल्यावरच समजेल.

अंकिता खरंच बिग बॉस मराठीच्या घरात जाणार का ? नेहमीच आपल्या स्वभावामुळे चर्चेत राहिलेली अंकिता बिग बॉस मराठीच्या घरात कसा खेळ खेळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

२८ जुलैला रात्री ९:३० वाजता बिग बॉस मराठी सीजन ५ चा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडणार आहे. सीझन ५ मध्ये कोण कोण स्पर्धक आहेत ? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT