Johnny Depp image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Johnny Depp : हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा फ्रेंच सिनेमा पुन्हा झळकणार, 'या' सिनेमाद्वारे करणार कमबॅक

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपने त्याची दुसरी पत्नी अँबर हर्डच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला जिंकल्यानंतर त्याने त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. त्याने त्याची दुसरी पत्नी अँबर हर्डच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला जिंकल्यानंतर त्याने त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. त्याने 'ला फेव्हरिट' या फ्रेंच सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे.ताज्या वृत्तानुसार,जॉनीचा पहिला फ्रेंच सिनेमा 'ला फेव्हरिट' (La Favorite) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स ओरिजनल आहे, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु नेटफ्लिक्सने या वृताचे खंडन केले आहे.

'ला फेव्हरेट'(La Favorite)हा जॉनी डेपचा फ्रेंच डेब्यू सिनेमा आहे.हा सिनेमा फक्त 'नेटफ्लिक्स फ्रान्स'वर प्रदर्शीत केला जाणार आहे. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शीत झाल्याच्या १५ महिन्यांनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल.माहितीनुसार, हा सिनेमा नेटफ्लिक्स ओरिजनल नाही,म्हणजेच नेटफ्लिक्सने या सिनेमाची निर्मिती केली नाही. नेटफ्लिक्सने केवळ फ्रान्समध्ये हा सिनेमा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची अनुमती या सिनेमाला दिला आहे.

'ला फेव्हरेट' या सिनेमामध्ये जॉनी डेपचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, मावेन ले बेस्को दिग्दर्शित या सिनेमात जॉनी डेप फ्रेंच राजा लुई १५ व्या च्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले असून तीन महिने वर्साय पॅलेससह अन्य विविध ठिकाणी शूटिंग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या सिनेमाची दिग्दर्शिका मावेन ले बेस्कोही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे. मावेन ले बेस्को ही जीन डू बॅरीच्या भूमिकेत दिसणार आहे. जीन डू बॅरी ही एक काउंटेस होती जी राजा लुईची शेवटची शिक्षिका होती. अँड्र्यू लेविटास दिग्दर्शित 'मिनामाता' या २०२० साली आलेल्या सिनेमानंतर,जॉनी डेप 'ला फेव्हरेट' या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे.

अँबर हर्ड विरुद्ध मानहानीच्या खटल्यामुळे जॉनी डेपची सर्वत्र चर्चा होती. दरम्यान,यावर्षी १ जून रोजी व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स काउंटमधील ७ सदस्यीय ज्युरीने जॉनीच्या बाजूने निर्णय दिला. ज्युरीने अँबर हर्डला जॉनी डेपची मानहानी केल्याप्रकरणी १०.३५ दशलक्ष डॅालर भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT