Comedian star Raju Srivastava Saam TV
मनोरंजन बातम्या

फेमस कॉमेडीयन राजू श्रीवास्तव जीममध्ये पडला होता बेशुद्ध; आता प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट

राजू श्रीवास्तव जीममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत होता. याचदरम्यान अचानक प्रकृती खालावली आणि तो ट्रेडमिलवरून खाली कोसळला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: फेमस कॅामेडीयन राजू श्रीवास्तव याची आज बुधवारी अचानक प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव आज सकाळी जीममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत होता. याचदरम्यान अचानक प्रकृती खालावली आणि तो ट्रेडमिलवरून खाली कोसळला. तिथेच बेशुद्ध पडला. यानंतर तात्काळ त्याला दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून, एन्जिओग्राफी करण्यात आली आहे. दरम्यान एन्जिओग्राफीनंतरही राजू श्रीवास्तव पुन्हा बेशुद्ध पडल्याची माहिती समजते. सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. अद्याप त्याचे एन्जिओग्राफीचे रिपोर्ट आले नाहीत. डॅाक्टर लवकरच त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देतील.

पाहा व्हिडीओ -

तत्पूर्वी, राजू श्रीवास्तवची प्रकृती आता ठीक आहे, अशी नवी माहिती देण्यात येत होती. सुनील पाल याने राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे व्हिडिओ शेअर करून सांगितले होते. व्हिडिओमध्ये त्याने राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे वृत्त खरे असल्याचे म्हटले होते.

दिल्लीच्या (Delhi) एम्स रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. आता प्रकृती ठीक आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो लवकरात लवकर बरा होईल, असेही पाल याने सांगितले होते. राजू श्रीवास्तवची अचानक प्रकृती खालावल्याने त्याचे चाहतेही चिंतेत आहेत.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT