Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding Update saam tv
मनोरंजन बातम्या

Sidharth-Kiara Wedding: कसे असणार सिद्धार्थ-कियाराचे वैवाहिक जीवन; 2 वर्षांनी दिसणार 'हे' चित्र

ज्योतिषी चिराग बेजान दारूवाला यांनी सिद्धार्थ-कियाराचे भविष्य सांगितले आहे.

Pooja Dange

After Marriage Life Of Sidharth-Kiara: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी 7 फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसवर कियारा-सिडच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत. करण जोहर, ईशा अंबानी, शाहिद कपूर, मीरा राजपूत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्न स्थळी उपस्थित आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे आज दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान लग्नगाठ बांधणार होते. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे अपडेट घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशातच प्रसिद्ध ज्योतिषी चिराग बेजान दारूवाला यांनी या जोडप्याच्या भविष्य सांगितले आहे. लग्नानंतर दोघांचे आयुष्य कसे असेल, तसेच त्यांनी किती मुले असतील हे त्यांनी सांगितले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि ​​कियारा अडवाणीच्या लग्नाविषयी बोलताना ज्योतिषी चिराग यांनी सांगितले की, दोघेही सामान्य लोकांसारखे आहेत. दोघांचे लग्न दीर्घकाळ टिकेल. कियारा एक चांगली पत्नी होईल. कियारा सिद्धार्थसाठी भाग्यवान ठरेल. लग्नाच्या दोन वर्षांत दोघांनाही मुले होतील. लवकरच त्यांचे एक प्रोडक्शन हाऊस असणार आहे. सिद्धार्थ खूप विचार करतो. तो कधीकधी खूपचा विचार करतो. त्याने जास्त विचार करणे कमी केले पाहिजे. स्वभाव बदलण्यासाठी ही चांगली वेळ आहे. सिद्धार्थला त्याच्या कुटुंबीयांकडून खूप पाठिंबा मिळत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची पहिली भेट 2018 साली लस्ट स्टोरीच्या रॅप-अप पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये रिलीज झालेल्या शेरशाह या चित्रपटात दोघे एकत्र दिसले. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. 2021 मध्येच कियारा अडवाणीने सिद्धार्थच्या आई-वडिलांना तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते.

सिड-कियाराने कधीही त्यांचे नटे जाहीर केले नाही. आता दोघेही लग्न करणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या लग्नात जवळपास 100-150 लोकांना आमंत्रित केले आहे. 'शेरशाह'नंतर सिद्धार्थ कियारा पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. दोघांनी नुकताच 'अदल बदल' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट साइन केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : नागपुरात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच महासत्संग आयोजन

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

SCROLL FOR NEXT