The Kerala Story Conflict Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story Controversy: प्रसिद्ध अभिनेत्याने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा जोडला थेट रामदास स्वामींशी संबंध; व्हिडिओ व्हायरल

The Kerala Story Conflict: अभिनेते योगेश सोमण यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे.

Pooja Dange

Actor Yogesh Soman On The Kerala Story Movie: 'द केरला स्टोरी' हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून अनेक वाद सुरू आहेत. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. कलाकार देखील पुढाकार घेत चित्रपटाला पाठिंबा देत आहेत.

यात जेष्ठ कलाकार शबाना आझमी आणि शरद पोंक्षे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान अभिनेते योगेश सोमण यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामींशी जोडला आहे.

अभिनेते योगेश सोमण यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे. या व्हिडिओत योगेश सोमण म्हणाले आहेत की, ''दोन दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.(Latest Entertainment News)

यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काहीजणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले.'

'याच दरम्यान अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, 'द केरला स्टोरी'ची 'वन लाइन'कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.''

'किती गुजरिणी, ब्राह्मीणी भ्रष्टविल्या.. किती शांबूखी जहाजी फाकविल्या.. किती एक देशांतरी मेल्या.. कित्येक सुंदरा हाल होऊनी मेल्या.. योगेश सोमण यांनी रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ या श्लोकातील या ओळींची आठवण करून दिली आहे.

तसेच त्यांनी या श्लोकाचा अर्थ देखील समजावून सांगितलं आहे, ''किती गुजरींनी आणि ब्राह्मिणी (स्त्रिया) भ्रष्टविल्या, शांबूखी म्हणजे 'शहामुखी' शब्दाचा अपभ्रंश आहे. शांबूखी जहाजावर फाकविल्या’ म्हणजे 'पाठवल्या'.

किती देशात त्या नेऊन विकल्या. तर किती सुंदरा, तरुणी हाल होऊनी मेल्या. त्यामुळे 'द केरळ स्टोरी'मध्ये हे सांगितलं आहे ते रामदास स्वामींनी चार ओळीतून शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे.' हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.

'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकला असला तरी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati calories: ४ चपात्यांमध्ये किती प्रमाणात कॅलरीज असतात?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १५००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील 18k, 22k आणि 24k चे दर किती?

Rajyabhishek Din 2026: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम...; राज्याभिषेक दिनानिमित्त खास मराठी शुभेच्छा अन् चारोळ्या

Face care: मॉइश्चरायझिंग आणि ग्लोईंग स्किनसाठी, रोज रात्री करा 'या' पेस्टने करा ५ मिनिटं मसाज

Maharashtra News Live Update: शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल

SCROLL FOR NEXT